Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरची दीड कोटींची फसवणूक

 अहिल्यानगर : व्हाटसअपवर शेअर ट्रेडिंगची माहिती देत गुंतवणुकीवर १० ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत केडगाव मधील डॉक्टरची तब्बल १ कोटी ६० लाख

अकोटमध्ये विजयी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
राहुरीत पतीचा गळा दाबून खून
महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

 अहिल्यानगर : व्हाटसअपवर शेअर ट्रेडिंगची माहिती देत गुंतवणुकीवर १० ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत केडगाव मधील डॉक्टरची तब्बल १ कोटी ६० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीची ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली असून या प्रकरणी २ जानेवारीला नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. चंद्रवदन देवतादिन मिश्रा (वय ६४, रा. बालाजी कॉलनी, अंबिकानगर बसस्टॉप मागे केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगावमधील डॉ. चंद्रवदन देवतादिन मिश्रा यांनी याबाबत फिर्याद दिलीये. डॉ. मिश्रा यांना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या व्हाटसअप नंबरवर नदीर वर्मा नावाच्या व्यक्तीने मेसेज करून वर्मा इन्व्हेस्टमेंट क्लब इंटर्नशीप ग्रुप टीम ए या ग्रुपला जॉइंट होण्यास सांगितले. फिर्यादी त्या ग्रुप मध्ये जॉइंट झाल्यावर त्यांना शेअर ट्रेडिंगची विविध प्रकारची फसवी व दिशाभूल करणारी माहिती पाठविण्यात आली.अमिषाला बळी पडून  १ कोटी ६० लाख ४० हजार रुपयांची रक्कम ट्रेडिंग साठी आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन पाठविली असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

COMMENTS