Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; मुंबई पालिकेची उमेदवारीही फायनल

मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या

इस्लामपूरचा आठवडी बाजार रविवारी एकच दिवस भरावावा : व्यापारी संघटनेची मागणी; अध्यक्ष मोहन पाटील
शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत
सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम

मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत महायुतीत दोस्टी कुस्ती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांदिवली मतदार संघातील प्रभाग क्रमांक 159 मधून आशिष माने यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या भाच्याला तर दुसरीकडे भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. दोघांचाही पक्ष प्रवेश करुन तिकीट दिल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांना 174 मधून तर भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना 156 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणुकांना अवघे 18 दिवस बाकी राहिले आहेत. मात्र, अजूनही महायुत्या, महाआघाड्यांची अधिकृत घोषणा झाली नाही. ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झाली. जागा वाटपचे अजून निश्‍चित झालेले नाही. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रत लढतील असे चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुध्द भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

COMMENTS