Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरचा आठवडी बाजार रविवारी एकच दिवस भरावावा : व्यापारी संघटनेची मागणी; अध्यक्ष मोहन पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील पारंपारिक आठवडी बाजार दोन दिवस होत असल्याने वाहतूक कोंडी, स्वच्छतेची गैरसोय आणि व्यापारातील विस्कळीतपणा निर्माण होत आ

मोरगिरी विकास सोसायटीत माजी मंत्र्याच्या पॅनेलकडून विद्यमान मंत्र्यांच्या पॅनेलचा धुरळा
भूकंपातील मृतांना कोयनेत श्रध्दांजली
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील पारंपारिक आठवडी बाजार दोन दिवस होत असल्याने वाहतूक कोंडी, स्वच्छतेची गैरसोय आणि व्यापारातील विस्कळीतपणा निर्माण होत आहे. त्यामुळे आठवडी बाजार फक्त रविवारी एकाच दिवशीच घ्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून जोर धरत आहे.
भाजी मार्केटचे बांधकाम सुरू असल्याने आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत आहे. त्यामुळे रहदारी वाढत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या गुरूवार आणि रविवार हे दोन दिवशी बाजार भरत आहे. तसेच दररोज सकाळी व सायंकाळी मंडई भरत असल्याने कोणाची कोणतीही गैरसोय होत नाही. बाजार दिवशी मुख्य रस्त्यांवर भाजीपाला, कांदे बटाटे दुकानांचे तंबू, फेरीवाल्यांची गर्दी आणि ग्राहकांची वाढलेली वर्दळ यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. दोन दिवस बाजार भरत असल्याने नगरपरिषद स्वच्छता यंत्रणेवर अतिरिक्त ताण, वाहतूक कोंडी, स्थानिक व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूर व्यापारी संघटना पुढाकार घेत असून आठवडी बाजार फक्त रविवारच्याच दिवशी ठेवावा, असा प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करण्याची तयारी व्यापारी संघटनेकडून सुरू आहे.
याबाबत व्यापारी संघटना अध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले की, रविवारी सर्व शासकीय कार्यालये बंद असतात. यल्लमा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रस्त्यावर बसणारा बाजार हा तहसीलदार कार्यालय ते कोर्ट परिसर पर्यंत भरावावा. शहरातील वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहण्यासाठी, स्वच्छता व्यवस्थापनास मदत होण्यासाठी आणि व्यापार्‍यांना व्यापार नियोजन करता यावे. यासाठी एकच बाजार दिवस हा योग्य पर्याय आहे. दोन दिवस बाजार भरल्याने गर्दी वाढते आणि व्यापाराचे स्वरूपही विस्कळीत होते. त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी संघटना रविवार हा एकमेव आठवडी बाजार दिवस ठेवण्याची मागणी करत आहे.
आठवड्यातून एकच दिवस बाजार ठेवल्यास वाहतुकीची समस्या कमी होईल. शहर स्वच्छतेत सुधारणा होईल. व्यापार्‍यांना व्यवसाय करण्याची सुलभता मिळेल. या मागणीसंदर्भात व्यापारी प्रतिनिधी, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन यावर तोडगा काढला पाहिजे. मात्र, अंतिम निर्णय नगरपरिषद स्तरावर घेतला जाणार आहे.

COMMENTS