Homeदेश

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांची हालचाल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अनंतनाग : अनंतनाग शहरातील बाजारपेठेत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या

Mukesh khanna : घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी धावून येता मग गायीच्या का नाही? (Video)
गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू उद्योगाची थट्टा उडवणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी
केरळमध्ये मान्सूनचे आगमन

अनंतनाग : अनंतनाग शहरातील बाजारपेठेत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या फुटेजच्या आधारे डेंगरपोरा आणि काजीबाग परिसरात सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली असून, दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, फुटेजमध्ये दिसणार्‍या दहशतवाद्यांपैकी एक कुलगाम जिल्ह्यातील खेरवन गावचा रहिवासी मोहम्मद लतीफ भट असल्याचे समोर आले आहे. दुसरा संशयित दहशतवादी पाकिस्तानी कमांडर हंजुल्लाह असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी त्याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस दल संयुक्तपणे दोघांचा शोध घेत असून, स्थानिक नागरिकांकडूनही माहिती गोळा करण्यात येत आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओवर 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.12 वाजताची वेळ नोंदलेली आहे. या व्हिडिओमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, स्थानिक दहशतवादी मोहम्मद लतीफने नोव्हेंबर महिन्यात लष्कर-ए-तोयबाची छुपी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘काश्मीर रिव्होल्यूशन आर्मी’मध्ये सहभाग घेतल्याचा दावा केला जात आहे. गेल्या सुमारे 30 तासांपासून सुरक्षा दलांकडून कसून शोधमोहीम सुरू आहे.

COMMENTS