Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदर्शनाच्या आधी सुभेदार चित्रपटाचा रेकॉर्ड

मुंबई प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासून तुफान चर्चा सुरु असलेला ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रयागराज यांचे निधन
इक्विटी शेयर्सच्या विक्रीतून भांडवल उभारणी करण्याची योजना 

मुंबई प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून तुफान चर्चा सुरु असलेला ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत तर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले असून प्रेक्षकांनी चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग केलं असून चित्रपटाने नवीन रेकॉर्ड केला आहे. सुभेदार’ चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.  चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पालचे याआधीचे शिवराज अष्टकमधील चारही चित्रपटांना  प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता सुभेदार चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधी एक नवीन रेकॉर्ड केले आहे. 

COMMENTS