केरळमध्ये मान्सूनचे आगमन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

तिरुवंतपुरम : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून लवकरच डेरेदाखल झाला आहे. त्यामुळे शेतक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?
मान्सून अंदमानात दाखल
पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण

तिरुवंतपुरम : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून लवकरच डेरेदाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावर्षी मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण, आता मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये डेरेदाखल झाल्यानंतर साधारणपणे आठवडाभरात महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यामुळे येत्या 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. केरळनंतर मान्सूनची महाराष्ट्रातील पहिली एन्ट्री तळकोकणात होते आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो. मान्सूनचा हा प्रवास पाहता तळकोकणात 5 जून आणि 7 किंवा 8 जून रोजी मुंबईत मान्सूनचा पहिला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.

COMMENTS