Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेमध्ये अबोला !

https://www.youtube.com/watch?v=-VxwSf4TJL4 मुंबई : महायुतीततील दुरावा अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपचे न

गुलाम नबी आझाद स्वगृही परतण्याचे संकेत
कंत्राटी पोलिस भरतीवरून विरोधकांनी घेरले  
अहिल्यादेवींच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे

मुंबई : महायुतीततील दुरावा अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपचे नेते अमित शहा यांची भेट त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला तरी, शिंदे नाराज असल्याचे शुक्रवारी दिसून आले. मुंबईतील हुतात्मा चौकातील अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील अबोला त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसून येत होता. काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे प्रवास केल्याची चर्चा असतानाच मुंबईत देखील या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झाला नसल्याने राजकीय चर्चेला आणखी जोर आला आहे. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. मात्र, त्यामध्ये नेहमीची देहबोली अन् उत्साह अजिबात दिसून आला नाही. तसेच तितका संवाद सुद्धा झाला नाही. त्यामुळे दोघांचे चेहरे बरंच काही बोलून जात होते.

COMMENTS