अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिशा देण्याचे काम केले. गणित या अवघड विषयात योगदान दिले. पुणे विद्याप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिशा देण्याचे काम केले. गणित या अवघड विषयात योगदान दिले. पुणे विद्यापीठाची जबाबदारी सांभाळताना उत्तमपणे काम केले. नांदेड येथे कुलगुरू असताना त्यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पडली. नामविस्तारावरून वाद झालेला असताना त्यांनी सर्वांशी समन्वय साधून यशस्वी मार्ग काढला. शिक्षण क्षेत्रातून त्यांनी समाजाची सेवा केली. समावेशक, दूरदृष्टी असलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाची समाजाला गरज गरज असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांनी केले.
कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती, गणित विभाग माजी विद्यार्थी संघ व न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.14 नोव्हेंबर) शिक्षण क्षेत्रात 44 वर्ष प्रदीर्घ योगदान देणारे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. शरद पवार बोलत होते. रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. के. ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार निलेश लंके, पद्मश्री पोपट पवार, डॉ. जब्बार बगदाद (इराक), ॲड. विश्वासराव आठरे, माजी कुलगुरु डॉ. अशोक कोळकर, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ.एस.एन. पठाण, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. उध्दव भोसले, कुलगुरु डॉ. जयंत वैशंपायन, डॉ. अरविंद दीक्षित, डॉ. उपेंद्र द्विवेदी, डॉ. मनोहर चासकर, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कॅनडा येथील डॉ. निंगराज, इराक येथील डॉ जब्बार.ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, उद्योजक अरविंद पारगावकर, पराग काळकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, ॲड. विद्याधर काकडे, रावसाहेब वर्पे, डॉ विवेक भापकर , जयंतराव वाघ, मुकेश मुळे आदींसह आजी-माजी कुलगुरु, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS