संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

संगमनेर / प्रतिनिधीअहिल्यानगर जिल्हा स्पोर्ट् असोसिएशनच्या वतीने पुढील आठवड्यात संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. द

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमकमहावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा

संगमनेर / प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा स्पोर्ट् असोसिएशनच्या वतीने पुढील आठवड्यात संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेवून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या दरम्यान राबवल्या जाणार्‍या निवड चाचणीतून स्पर्धकांना राज्यस्तरीय संघात जाण्याची संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर योगासन भारतच्या माध्यमातून देशभरातील प्रतिभांचा शोध घेवून त्यांना मंच उपलब्ध करुन देण्यात आला. त्यासाठी राज्यपातळीपासून तालुस्तरापर्यंत संघटनात्मक साखळी निर्माण करुन तळागाळातून योगासनांमधील प्रतिभांचा शोध सुरु झाला.

त्याचा परिणाम गेल्या पाच वर्षात पार पडलेल्या खेलो इंडिया, नॅशनल गेम्ससह राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा आणि नुकत्याच पार पडलेल्या एशियन स्पर्धेसह बिहार खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्र संघाने आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील योगासनपटूंनी विशेष कामगिरी करताना शेकडों सुवर्णपदकं पटकावली.

योगासनांमधील अशाच प्रतिभांचा शोध घेवून त्यांना प्रशिक्षण आणि पुढील स्पर्धांसाठी तयारीचा भाग म्हणून जिल्हास्तरावर अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. पुढील आठवड्यात दि. १७ व १८ जुलै रोजी संगमनेरातील मालपाणी लॉन्स येथे या स्पर्धा होत असून त्यात संपूर्ण जिल्ह्यातून दोनशेहून अधिक योगासनपटू सहभागी होतील असा अंदाज आहे.

या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या योगासनपटूंनी शनिवारपर्यंत ऑनलाईन नावे नोंदणी करावी अधिक माहितीसाठी (९८२३१३८८५६) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा असोसिएशनचे सचिव उमेश झोटींग व कोषाध्यक्ष कुलदीप कागडे यांनी केले आहे. या स्पर्धेतून राज्य संघासाठीच्या खेळाडूंची निवडही केली जाणार आहे.

COMMENTS