Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले

मुंबई, दि.७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून
बारामतीचा बदलता इतिहास मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करा : उपमुख्यमंत्री पवार
या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद

मुंबई, दि.७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे  सामूहिक गायन करण्यात आले.

राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम्’चे  सामूहिक गायन केले.

सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या  ‘वंदे मातरम् ‘ या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

COMMENTS