Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडाखांच्या मंत्रिपदासाठी ठाकरेंनी खोके घेतले

आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर ः महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शंकरराव गडाख यांच्या मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी खोके घेतले, असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार

संजय राऊत मोकाट सोडलेलं बोकड 
संजय शिरसाठ यांच ट्विट म्हणजे त्यांच्या आंतरातम्याचा आवाज.
ड्रग्ज प्रकरणात आमदार-खासदारांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर ः महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शंकरराव गडाख यांच्या मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी खोके घेतले, असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा आरोप यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात आणले असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये 3 अपक्ष आमदारांना मंत्रिपद का देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही ते उद्धव ठाकरे बघितले आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. म्हणजे तेव्हा राष्ट्रीय नेतृत्व उद्धव ठाकरेंचे झाले होते. मात्र, त्यांना अजित पवार आणि नाना पटोले यांच्या लेव्हलवर आणूण बसवले आहे. म्हणून शरद पवार नागपुरात असून सभेला आले नाहीत असा टोला लगावला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या या सहानुभुतीचा फायदा अजित पवार घेत असून मविआमध्ये तेच भावी मुख्यमंत्री म्हणून फिरत आहे. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, मविआच्या काळात बहुमत असताना शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ आमदार असताना 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे अपक्ष आमदारांना का देण्यात आली. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत देवाची, दिवगंत बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगावे, की शंकरराव गडाख यांना मंत्री पद का दिले? त्यांनी पक्षांच्या एका तरी बैठकीला हजेरी लावली होती का? मग महेरबानी का दाखवली. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी किती खोके घेतले. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरेंनी युती केली. मात्र, आजच्या सभेत ते स्टेजवर कुठेही नाही, असे का? केवळ गरज पडेल तसे लोकांना वापरुन घ्यायचे असा त्यांचे काम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. ही सभा म्हणजे हतबल सभा असल्याची टीका केली आहे.

COMMENTS