Homeताज्या बातम्यासंपादकीय

आयोगाविरूध्द महाविकास आघाडीचा भगवा मोर्चा !

खोट्या मतदार नोंदणीचा आरोप करित निवडणूक याद्या आधी दुरूस्त करा आणि मगच निवडणूका घ्या असं आवाहन करित महाविकास आघाडीचा मोर्चा काल भव्य स्वरूपात मुं

ललित पाटील प्रकरणाचे वास्तव! 
धक्कादायक ! डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात जिवंत I LOKNews24
नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

खोट्या मतदार नोंदणीचा आरोप करित निवडणूक याद्या आधी दुरूस्त करा आणि मगच निवडणूका घ्या असं आवाहन करित महाविकास आघाडीचा मोर्चा काल भव्य स्वरूपात मुंबईत आझाद मैदानाजवळ धडकला. या मोर्चामध्ये काॅंग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रमुख होते. महाविकास आघाडीचे घटक दल असलेले माकप, भाकप, शेकाप, समाजवादी आदि पक्षांचाही समावेश महाआघाडीच्या मोर्चात असला तरी मंचावर चारच पक्षाच्या नेत्यांनी भाषण केले. त्यात, काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात, मनसे’चे राज ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते स्वतः आणि शरद पवार या चारच वक्त्यांची भाषणे झाली. अर्थात, मोर्चात सर्वाधिक प्रभाव मात्र मनसे’चा जाणवला. एरव्ही, सर्व पक्षीय झेंडे सर्वत्र दिसायला हवे होते; परंतु, भगवा झेंड्याचाच मोर्चात वरचष्मा होता. याचा अर्थ महाविकास आघाडीतील घटक दलातील समन्वयाचा अभाव असावा किंवा राज ठाकरे यांच्यांशी काॅंग्रेस आणि इतर काही पक्षांचे मतभेद असावेत! मोर्चासाठी एका बाजूने जय्यत तयारी सुरू असतानाच मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गटबाजीचे स्वर उमटल्याचे दिसून आले. मुंबई काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याबाबत कोणताही अधिकृत संदेश पाठविण्यात आलेला नव्हता, अशी माहिती समोर आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निर्देश दिले असले, तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मताची चोरी कोण करत आहे आणि कशी चोरी होत आहे? हे पकडून देण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे जिथे जिथे लोकशाही वाचवायची असेल आणि पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तिथे काँग्रेस राहील आणि काँग्रेस राहणार. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी झालो आहे, असे त्यांनी म्हटले.  बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार मंचावर उपस्थित असले तरी, काॅंग्रेसकडून भाषण केवळ थोरांतांचे झाले. ज्यांना सभेत चारही नेत्यांमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान दिले गेले. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष न येणे यावरून महाविकास आघाडीत काॅंग्रेसकडे नेतृत्व मोर्चाचे नेतृत्व दिले गेले नाही; असे स्पष्टपणे दिसते. परंतू, राज ठाकरे यांनी अनेक गौप्यस्फोट या मोर्चातील सभेत केले. कल्याण ग्रामीण, भिवंडी, डोंबिवली या ठिकाणच्या साडे चार हजार मतदारांनी मुंबईच्या मलबार हिलमध्ये मतदान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभारून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तर, बाळासाहेब थोरात यांनी हा मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात जसा आहे, तसा त्यांना मदत करणाऱ्या सत्तेविरोधात ही आहे. मतचोरी करून सत्ता मिळवण्याचा नवा प्रकार निवडणूक आयोगाच्या मदतीने सध्या केला जात असल्याचा ही आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे. लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चात केले. पुढे आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, ‘आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निर्णय घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ.’ एकंदरीत, मोर्चा भव्य स्वरूपात होता. परंतु, भगवे झेंडे अधिक असल्याने महाविकास आघाडीचा समतोल अभावानेच जाणवला. या मोर्चाला सामोरे जाण्यापूर्वीच शिवसेनेचे संजय राऊत आजारी पडले. अर्थात, आजच्या मोर्चात ते सामिल झाले असते तरी, त्यांनाही भाषण करण्याची संधी मिळाली नसती, हे देखील तेवढेच सत्य. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मतदार याद्यांची माहिती काढून आणली होती; ते पाहता आणि त्यांनी एक वर्षं ही निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी पुढे ढकलल्या तरी चालेल, हे त्यांचे वक्तव्य सर्वांच्या भुवया उंच उडवणाऱ्या होत्या. कदाचित, सत्ताधारी भाजपला निवडणुका नको आहेत; त्यांची रि ओढणारे तर हे वक्तव्य नाही ना? असा प्रन सर्वांनाच भेडसावून गेला!

COMMENTS