लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या एनबीए नामंकित आणि नॅक ए श्रेणी मानांकित प्रवरा ग्रामीण अभिया
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या एनबीए नामंकित आणि नॅक ए श्रेणी मानांकित प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील ११ विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय घरडा केमिकल्स कंपनीत ४.७५ लाखावर निवड झाली आहे, अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये करण शेळके, रोहन पवार, अनिकेत गायके, निलेश चोळके, सूरज निर्मळ , निकिता भोसले, सई लोखंडे, कुणाल गाडेकर, ललित पठारे, पंकज साबळे आणि शिवम उंबरकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी चिपळूण येथे आयोजित या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड प्रक्रियेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या विद्याथींच्या यशासाठी ट्रेंनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा.वर्षा गायकवाड, प्रा. मोहसीन शेख तसेच प्रा. नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. आण्णासाहेब वराडे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. सुनील मिसाळ, डॉ. चंद्रकांत कडू, डॉ. मिलिंद म्हस्के, प्राचार्य संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजेंद्र निंबाळकर तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. अण्णासाहेब वराडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आम्हा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध कौशल्य प्रदान करण्यात आले. शिक्षणाबरोबरच प्रक्षेत्र भेटी, विविध चर्चासत्र, परिसंवाद संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र या माध्यमातून आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या बदलाची माहिती मिळाली. त्याचबरोबर महाविद्यालयाने दिलेल्या विविध सेवा सुविधांमुळे आम्हाला हे यश मिळाले अशी प्रतिक्रिया निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.

COMMENTS