Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनव्यापासून वनसंपदेच्या बचावासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करा : ना. गणेश नाईक

सातारा / प्रतिनिधी : जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत

स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप
जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप
आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार

सातारा / प्रतिनिधी : जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.
महाबळेश्‍वर येथील वन विभागाच्या हिरडा सभागृहात वनविभागातील योजनांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री नाईक अध्यक्षतेखाली अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक पंकज गर्ग, सातारच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, कोयना वन्यजीव प्रकल्पचे उपसंचालक किरण जगताप, सामाजिक वनीकरण सातारचे विभागीय वन अधिकारी हरिश्‍चंद्र वाघमोडे, वन विकास महामंडळ पुणे येथील विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, चांदोली वनजीव विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील आदी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले, सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी तणाव मुक्त, आनंददायी वातावरणात काम करून वन विभागाचे बळकटीकरण करावे. वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडे उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. प्रत्येक वन परिक्षेत्रात सुरंगी, बकुळी, बेल, मोह, भाडोळी जांभूळ या रोपांची लागवड करण्यावर प्राधान्य द्यावे. याचबरोबर सीजनल फळे व रीजनल फळांच्या रोपांच्या लागवडीवर भर देण्यात यावा. वन विभागाच्या जुन्या व नादुरुस्त वाहनांची यादी करावी. अशा वाहनांचे विहित पध्दतीने निर्लेखन करावे. जंगलात फिरतीवर असणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी मजबूत बनावटीची वाहने खरेदी केली जातील.

COMMENTS