Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुजित झावरे हातात घेणार धनुष्यबाण ?

अहिल्यानगर : जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद

25 किलोच्या खारीक-खोबर्‍याच्या हारातून शिक्षणसेवेचा गौरव;प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकरांकडून मधुसूदन देशमुखांचा आगळावेगळा सत्कार
पत्त्याच्या डावावरील पैशांच्या उधारीतून खून; हदगाव तालुक्यातील निवघा गावात तरुणाची हत्या, मित्र गंभीर जखमी
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी मी सदैव; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Displaying MIR_4348.jpeg

अहिल्यानगर : जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर धनुष्यबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षबदलामुळे शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रभाव आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह सुजित झावरे यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS