डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती ठणठणीत

Homeमहाराष्ट्र

डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती ठणठणीत

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम असून ते दूध पिऊन झोपले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी सोमवारी रात्री प्रसार माध्यमातून दिली.

सर्वच क्षेत्रात तरबेज असणे गरजेचे ः चैतालीताई काळे
महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे
डॉक्टरसह तिघांना 1 कोटी 8 लाखांचा गंडा


कोल्हापूर / प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम असून ते दूध पिऊन झोपले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी सोमवारी रात्री प्रसार माध्यमातून दिली.

प्रा. पाटील हे कोरोनाला हरवून रविवारी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांच्या लग्नाचा सोमवारी हीरकमहोत्सवी वाढदिवस होता. रात्री आठ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी दूध घेतले आणि झोपी गेले. अचानक रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लगेच एका वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूजही दिली. जी पोस्ट व्हायरल झाली तिचा आधार घेऊन ही ब्रेकिंग न्यूज देण्यात आली. त्याबद्दल सरोज पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही बातमी ऐकून जबर धक्का बसला. ही अत्यंत चुकीची बातमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत संबंधित वृत्तवाहिनीने एन. डी. कोरोनाला हरवून घरी आल्याचे वृत्त दिले. त्यामुळे खोट्या बातमीवर पडदा पडला. पण प्रकारचा पाटील कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झाला.

COMMENTS