Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड नगराध्यक्ष खुला महिला राखिव झाल्याने राजकिय प्रतिष्ठा पणाला

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे संपूर्ण शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आल

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तीन खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : विरोधी पक्ष नेते दरेकर यांची मागणी
चांदोली परिसरात अतिवृष्ठी सुरु; वारणा धरणातून विर्सग वाढविला

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे संपूर्ण शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यंदा म्हसवड नगराध्यक्षपद खुला महिला या गटासाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयामुळे राजकीय समीकरणे अक्षरशः उलटीपालटी झाली आहेत. अनेकांची राजकिय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
शहरात सध्या सर्वत्र होणार्‍या बैठकींमध्ये एकच चर्चेचा विषय आहे आता नगराध्यक्ष कोण? मात्र या चर्चेतून नगराध्यक्ष म्हसवडकर हवी; बाहेरची नको. असा जनतेचा सूर एकमुखी उमटताना दिस आहे.
गेल्या काही वर्षांत म्हसवड शहरात नागरी सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आणि स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांत किती प्रगती झाली आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. अजूनही शहरातील अनेक प्रलंबित प्रश्‍न आहेत. त्यामुळे नागरिकांचा ठाम विश्‍वास आहे की, शहराचा विकास फक्त स्थानिक नेतृत्वाच्या हातूनच शक्य आहे.
राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व इच्छुक महिला उमेदवार यांचे सोशल मीडियावरून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत देणे सुरू झाले आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवरून नागरिक थेट मत प्रदर्शन करताना दिसतात. म्हसवडसारख्या ऐतिहासिक व वाढत्या शहरात स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी, या अपेक्षेने सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, महिला गट, आणि युवा वर्ग एकत्र येताना दिसत आहेत.
पक्ष काहीही असो, नगराध्यक्ष स्थानिक असावी. आता सर्वांचे लक्ष शहरातील मोठ्या राजकीय पक्षांच्या निर्णयाकडे लागले आहे. ते स्थानिकांच्या भावनेचा सन्मान करतील का, की पुन्हा बाहेरच्यांवर विश्‍वास ठेवतील? म्हसवडच्या नागरिकांच्या अपेक्षा आणि भावना पाहता, यंदाची नगराध्यक्षपदाची लढत ऐतिहासिक ठरणार, हे नक्कीच म्हणता येईल.

COMMENTS