Homeताज्या बातम्यासंपादकीय

शरद पवारांच्या मंडल यात्रेवर शंका का !

नऊ ऑगस्ट हा भारतात क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो; त्याचप्रमाणे, तो जागतिक मूलनिवासी दिवस सुद्धा आहे. मात्र, याच दिवसाचं औचित्य साधून महाराष

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप
सावित्रीबाई फुले विद्यापीठांवर अमित ठाकरेंनी काढला मूक मोर्चा
अफजलखान कबर परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

नऊ ऑगस्ट हा भारतात क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो; त्याचप्रमाणे, तो जागतिक मूलनिवासी दिवस सुद्धा आहे. मात्र, याच दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे तथा देशाचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी, ओबीसींच्या आरक्षणासाठी नागपूर येथून मंडल यात्रा काढण्याचे ठरवले आहे. अर्थात, शरद पवार हे कधीही सरळ स्वभावाचे राजकारणी नाहीत; हे महाराष्ट्राला निश्चितपणे माहिती आहे. २३ मार्च १९९४ ला शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र हे असे पहिले राज्य ठरले की, ज्यांनी मंडल आयोगाची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला.  या पराभवामध्ये शरद पवार यांचाच हात होता, अशी जाहीर बातचीतही त्या काळात करण्यात आली. त्यानंतर, पाच वर्ष भाजप-सेना युतीचे सरकार राहिले. ४ वर्ष मनोहर जोशी मुख्यमंत्री राहिले. तर, ६ महिने नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि त्याच दरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही स्थापना केली; काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष मिळून त्यांनी निवडणूक जिंकली. राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. अर्थात मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतरही राज्यामध्ये सरकार कोसळण्याचा जो प्रकार झाला, तो ओबीसींच्या मतांमुळे झाला नाही तर शरद पवार यांनी केलेल्या अंतर्गत राजकारणामुळे तो झाला. कारण, ओबीसींसाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करूनही आपला राजकीय पराभव होतो, हे समीकरण शरद पवार यांना उभं करायचं होतं. परंतु, आज ओबीसींची राजकीय ताकद शरद पवार यांना जाणवली असल्यामुळे, पुन्हा त्यांनी या नाटकाचा उलट प्रारंभ सुरू केला आहे.  महाराष्ट्रात ९ ऑगस्ट रोजी त्यांनी नागपूर येथून मंडल यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जिल्ह्यांमध्ये जाणारी ही मंडल यात्रा खासकरून ओबीसींच्या आकर्षणासाठी त्यांनी ठेवलेली आहे. अर्थात, मराठा आरक्षणाचे राजकारण ते याच्या आडून निश्चितपणे करीत राहतीलच! त्यामुळे, शरद पवार यांच्या राजकारणाची दृष्टी ही कधीही सरळ रेषेत असत नाही. त्यामुळे नागपूर येथून ९ ऑगस्ट रोजी सुरू होणारी त्यांची मंडल यात्रा, ही महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात वेगवेगळे दृष्टिकोन ठेवून आखण्यात आलेली असावी; यावर निश्चितपणे एक शंका उपस्थित होते. शरद पवार गेली दहा वर्षे सत्तेतून बाहेर असले तरी, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेत मोठ्या घडामोडी घडवण्या इतपत त्यांची राजकीय शक्ती निश्चित आहे. परंतु, त्यांनी गेली दहा वर्ष आपली राजकीय सत्ता येऊ नये यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. कारण, त्यांना राज्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना प्रामुख्याने कमजोर करायचं होतं आणि ती भूमिका आता त्यांनी पार पाडलेली आहे. अर्थात, हे श्रेय केवळ त्यांना दिले पाहिजे असं नाही; परंतु, या दरम्यानच्या काळामध्ये अतिशय मुत्सद्दी आणि तितकच सशक्त आणि शरद पवार यांच्या राजकारणाला टक्कर देणारं नेतृत्व महाराष्ट्रात उभे राहिलं, आणि ते नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वेगवेगळ्या विषयांनी प्रवेश केला आहे. या सगळ्यांमध्ये मंडल हा विषय घेऊन शरद पवार हे नागपूर इथून जरी मंडल यात्रा सुरू करणार असले तरी, अनेक वर्ष ते सत्तेत राहिले. त्यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र निर्माण केल्यानंतरही ते पंधरा वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेत होते आणि या राजकीय सत्तेच्या काळामध्ये वर देखील काँग्रेसचे सरकार होते. परंतु, त्यांना ओबीसींच राजकीय आरक्षण हे संवैधानिक करून घेता आलं नाही, याचा अर्थ त्यांची राजकीय इच्छाशक्ती नव्हती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला टोलवलच आहे. त्यामुळे त्यांच्या आता निघणाऱ्या या मंडल यात्रेवर म्हणूनच शंका घ्यायला वाव आहे.

COMMENTS