Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये मिळणार पेन्शन

मुंबई : राज्य शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सन्माननिधी दरमहा 11 हजार रुपयांवरून वाढवून 20 हजार रुपये करण्याच

अर्धापूरजवळ भरधाव कारचा कहर; आखाड्यात घुसून शेतमजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू
खनिज उत्खनन क्षेत्रात महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्यापार वृद्धीच्या संधी : मंत्री जयकुमार रावल
जि.प. शाळा रावी येथे ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ उत्साहात संपन्न

मुंबई : राज्य शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सन्माननिधी दरमहा 11 हजार रुपयांवरून वाढवून 20 हजार रुपये करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र, त्यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांना २० हजार रुपये पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने आजपासून संबंधित लाभार्थी पत्रकारांना वाढीव सन्माननिधी प्रत्यक्ष अदा करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, आता पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 20 हजार रुपये सन्माननिधी प्राप्त होणार आहे. यामुळे राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS