Homeताज्या बातम्यासंपादकीय

देशाचे नवे उपराष्ट्रपती नितीश कुमार असतील ?

देशाच्या इतिहासात आतापर्यंत जगदीप धनखड यांची निवड होण्यापूर्वी १३ उपराष्ट्रपती मिळाले. मात्र, चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा कार्यका

महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 
अपहरण, खंडणी, स्टॅम्प घोटाळा, भ्रष्टाचार यांचा संयुक्त शब्द म्हणजे मोपलवार !
महाराष्ट्राच्या शिक्षणाची ‘जीव’घेणी अवस्था !

देशाच्या इतिहासात आतापर्यंत जगदीप धनखड यांची निवड होण्यापूर्वी १३ उपराष्ट्रपती मिळाले. मात्र, चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा कार्यकाळ अतिशय आश्चर्यचकित पद्धतीनं संपुष्टात येणारा राहिला. कोणत्याही उपराष्ट्रपतींनी आजपर्यंत राजीनामा दिला नाही; किंबहुना, त्यांनी टर्म पूर्ण केली अथवा राष्ट्रपती पदावर त्यांची निवड झाली, अथवा त्यांचा देहांत झाला तर, याच कारणास्तव आजपर्यंत उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नव्हता. परंतु, राजीनामा देऊन उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आणणारे जगदीप धनखड हे पहिले उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्या या राजीनामा मागे अनेक कारणे असली तरीही, सरकार पक्ष आणि जगदीप धनखड यांच्यामध्ये एक बेमालुमपणे बेबनाव निर्माण झाल्याची चर्चाही केली जात होती. आजपर्यंत जगदीप धनखड यांची जी खुली वक्तव्य आली, सरकारच्या अगदी समर्थनामध्ये किंवा सरकारच्या नीतीला पोषक अशीच होती. तरीही, एकाएकी जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा का द्यावा लागला, ही गोष्ट देशामध्ये सर्वांच्या समोर एक प्रश्न बनवून राहिली आहे. अर्थात, जगदीप धनखड यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षांना अनेक वेळा बोलू देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; किंवा अनेक वेळा त्यांनी टोकाटोकी केल्याचा आरोप ही विरोधी पक्षांनी केला. यामुळे, त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही बऱ्याच वेळा झाला. असं असलं तरी जगदीप धनखड त्यांच्या पदावर कायम होते. मात्र, काल संसदीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस असताना एकाएकी असं काय घडलं की, त्यांना आपल्या पदाचा रात्री नऊ वाजता राजीनामा द्यावा लागला. अर्थात, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा अध्यक्ष म्हणून पदसिद्ध कार्यरत असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यामध्ये अनेक वेळा बेबनाव झाला. संघर्ष झाला. विसंगती ही त्यांच्यात अनेक वेळा दिसून आल्या. विरोधी पक्षाने तर त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप अनेक वेळा लावला; तरीही, जगदीप  धनखड हे त्यांच्या पदापासून परावृत्त झाले नाहीत. किंबहुना उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असले तरी ते सतत सभागृहाचे संचलन करत नाही; असा आतापर्यंतचा इतिहास आहे! मात्र, जगदीप धनखड जेव्हापासून उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष झाले, तेव्हापासून सभागृहात अधिकाधिक काळ बसून राहणं आणि सभागृहाचे संचलन करणं, हा त्यांचा स्थायीभाव राहिला. अर्थात, ही गोष्ट त्यांनी जी केली असेल ती खरंतर सरकार पक्षाच्या बाजूने केली आहे. त्यांनी सभागृहात सर्वाधिक वेळ दिला. परंतु, त्यांचा राजीनामा हा देखील सरकारच्या नितीनिर्धारणाचा किंवा ध्येयधोरणाचा भाग बनला आहे का? असा प्रश्न देशवासीयांच्या समोर निश्चितपणे उभा राहिलेला आहे. परंतु, जगदीप  धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा अद्यापही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केली नसल्याने, त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही हा देखील प्रश्न कायम आहे. परंतु, असं मानलं जातं की, त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या या राजीनाम्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याउलट काँग्रेसमध्ये स्लीपर सेल म्हणवले जाणारे जयराम रमेश यांनी मात्र जगदीप  धनखड यांच्या समर्थनार्थ गुगली टाकणारी पोस्ट समाज माध्यमांमध्ये लिहिली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या मधली एक छुपी पद्धत निश्चितपणे समोर आली आहे. अर्थात, जर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला तर अवघ्या ६० दिवसात निवडणूक आयोगाला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा करावी लागेल आणि यासाठी पहिल्या क्रमांकावर जे नाव चालतं आहे, त्या नावामध्ये महाराष्ट्राच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने असला तरी, बिहार निवडणुका लक्षात घेता नितिश कुमार यांची सोय लावणं अधिक गरजेचे आहे, म्हणून कदाचित देशाचे नवे उपराष्ट्रपती नितीश कुमार असतील!

COMMENTS