Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टिचभर राजकीय उंची नसणाऱ्यांनी आ. रोहित पवारांची बरोबरी करु नये 

राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण ढेरे यांचे भाजपाच्या पत्रकाला प्रत्युत्तर

कर्जत प्रतिनिधी  -टिचभर राजकीय उंची नसलेल्यांनी आमदार रोहित पवार यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. आ. पवार यांनी बारा खात्याचे मंत्री असणाऱ्

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
भाजप श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी भानदास खामकर
अहमदनगरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

कर्जत प्रतिनिधी  -टिचभर राजकीय उंची नसलेल्यांनी आमदार रोहित पवार यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. आ. पवार यांनी बारा खात्याचे मंत्री असणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव केलेला आहे. राम शिंदे यांना दहा वर्षाच्या कालावधीत पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री असताना जी कामे करता आली नाहीत ती कामे आमदार रोहित पवार यांनी अडीच वर्षाच्या काळात मतदारसंघामध्ये केलेली आहेत. आ. रोहित पवार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी कामे मंजूर झाली आणि जी पूर्णत्वाकडे आलेली होती त्यापैकीच एक असलेल्या पोलीस वसाहतीच्या कामाचे उद्घाटन परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते भूषण ढेरे यांनी केले आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकाला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे, आ. रोहित पवार यांनी कर्जत येथे बॅनरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले, ही एक चांगल्या प्रकारची बाब आणि संस्कृती आहे. राम शिंदेंना हे कधीच करता आले नाही. पदावर नसताना राम शिंदे यांचे कार्यकर्त्यांबरोबरचे वागणे, बोलणे वेगळे असते आणि ज्यावेळी ते सत्तेत किंवा पदावर येतात त्यावेळेस त्यांचे वागणे, बोलणे वेगळे असते हे कर्जत- जामखेडमधील जनतेला व कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे.

राहिला भाग जिल्हाध्यक्ष यांच्याबाबतचा, राजेंद्र फाळके हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. बातमीत तुम्ही याबाबत काही मांडले आहे. आ. रोहित पवार व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यात कुठल्याच प्रकारचे मतभेद नाहीत. फाळके हे पक्षातील एक ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांना नेते मानतो. उलट विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्याबद्दल जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या व भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांच्या मनामध्ये काय भावना आहे, हे जरा आपण तपासून पहावे. जिल्ह्यातील एकही कार्यकर्ता व पदाधिकारी राम शिंदे यांच्याविषयी पाठीमागे चांगले मत व्यक्त करत नाही. 

प्रवेश केलेल्याबद्दल तुम्ही सांगता की आ. रोहित पवार यांनी काळजी करायचे कारण नाही, हो आम्ही काळजी करत नाही. परंतु वस्तुस्थिती बोलून दाखवलेली आहे. राम शिंदे यांनी २०१४ ला ज्या नेत्यांना खोटी आश्वासने देऊन पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्या नेत्यांना त्यांनी व्यवस्थितरित्या राजकारणातून बाजूला ठेवून त्यांची राजकीय उंची कमी करण्याचे काम केले.

उलट खऱ्या अर्थाने २००९ पासून ते २०१९ पर्यंत राम शिंदे यांच्या जडणघडणीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते किंवा २००९ ला ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून राम शिंदे आमदार होण्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांना मात्र राम शिंदे यांनी व्यवस्थितरित्या बाजूला ठेवले. त्यांची राजकीय उंची वाढणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त केला होता. 

आ. शिंदे यांना सोडून जाण्याची मानसिकता – २००९ पासून ज्यांनी राम शिंदे यांना साथ दिली ते अनेक सहकारीही आता सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत, याचा विचार भारतीय जनता पार्टीने करावा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आ. रोहित पवारांचे नेतृत्वाखाली सर्व व्यवस्थित चाललेले असून भविष्यामध्ये त्याची आपल्यालाही चुणूक दिसल्याशिवाय राहणार नाही.

COMMENTS