Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणार – कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १८ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्या

विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
नीटची तयारी की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?पेपरफुटी प्रकरणाने ‘लातूर पॅटर्न’वरच संशयाची सावली; आरसीसी कोचिंगचे संचालक सीबीआयच्या ताब्यातनांदेडमध्येही धाडसत्र, कोचिंग कार्यालयांना टाळे; हजारो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त

मुंबई, दि. १८ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. लोढा बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, यापूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती. नंतर लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

COMMENTS