राष्ट्रीय खाद्यतेल अभियानामध्ये शेतक-यांनी सहभागी व्हावे – शैलेश देशमुख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानामध्ये शेतक-यांनी सहभागी व्हावे – शैलेश देशमुख

लोणी प्रतिनिधी /खाद्यतेल उत्पादनामध्ये देश आणि राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञा

खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या गाडीची तोडफोड
मेक्सिकोत ट्रकला भीषण अपघातात 53 जणांचा मृत्यू| DAINIK LOKMNTHAN
निम्मे पदवीधर भारतात बेरोजगार! 

लोणी प्रतिनिधी /
खाद्यतेल उत्पादनामध्ये देश आणि राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे आणि या अभियानामध्ये सहभागी व्हावे. असे प्रतिपादन बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया २०२५-२६ अंतर्गत कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान विषयी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित यावेळी देशमुख बोलत होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी,तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी पोहेगाव अपूर्वा वामन, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सर्वश्री शांताराम सोनवणे भरत दवंगे डॉ. विलास घुले, डाॅ.प्रियंका खर्डे, डॉ. विठ्ठल विखे, सज्जला लांडगे,कैलास लोंढे आणि शेतकरी उपस्थित होते.

मृदा विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख शांताराम सोनवणे यांनी पिकांचे रासायनिक खते,
अन्नद्रव्यवस्थापन त्यामध्ये सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे त्यावर उपाययोजना खतांची मात्रा, देण्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करताना जमिनीमधील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी स्थानिक कल्चर निर्मिती, मातीचे आरोग्य, मातीची सुपीकता वाढवण्याचे पर्याय यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर भरत दवंगे यांनी सोयाबीन आणि भुईमूग पिकातील कीड रोग नियंत्रण योग्य कीटकनाशके यावर मार्गदर्शन केले आणि
सज्जला लांडगे यांनी तेलबिया पिकांतील प्रक्रिया उद्योगातील संधी आणि आव्हाने यामध्ये लाकडी घाणा कोल्ड प्रेस ऑइल मिल याविषयी मार्गदर्शन केले .

यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, संचालक डॉ. उत्तमराव कदम, सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यासाठी कायमच प्रयत्न होत असतात.
सोयाबीन आणि भुईमूग पीक उत्पादन तंत्रज्ञानात पीक पद्धती, आंतर पिके, बीज प्रक्रिया, नवीन वाणाची निवड, उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी, तणनाशकांचा वापर त्याची योग्य मात्रा आणि योग्य वेळ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

COMMENTS