Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान

इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचा उपक्रमकराड / प्रतिनिधी ः सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 169 व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या व सद्ग

माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन
इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी
म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु

इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचा उपक्रम
कराड / प्रतिनिधी ः सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 169 व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या व सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्यावतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2025 हा कार्यक्रम सोमवार, दि. 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय विद्यानगर कराड येथे आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार वसंतराव जाधव यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव या पुरस्काराने तसेच मान्यवर पत्रकारांचाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास कृष्णा विश्‍व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, सनबीम उद्योग समुहाचे सीईओ सारंग पाटील, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू सरपंच सौ. रुपाली भोईटे, उपसरपंच शिवाजी साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव जाधव (वाठार स्टेशन ता. कोरेगाव) यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवन गौरव पुरस्कार, अनिल देसाई (संपादक), प्रा. डॉ. विनोद बाबर (उंब्रज) प्रेरणादायी व्याख्याते, हणमंतराव साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार सांगली, कु. गौरी आवळे, उपसंपादक, डॉ. संदीप डाकवे, प्रसिध्द सुलेखनकार, तळमावले यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

COMMENTS