Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिगाव (ता. वाळवा) येथील माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील (वय 92) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसापासून त्य

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
अतिक्रमणे काढून घ्या नाही तर आजपासून कारवाई; महामार्गाला खेटून रेटून केलेली अतिक्रमण काढण्याचा आदेश जारी
फलटण येथील बांधकाम व्यावसायिकावर खूनी हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिगाव (ता. वाळवा) येथील माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील (वय 92) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसापासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्या शिगाव येथील घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे विश्‍वासू व निष्ठावंत सहकारी तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे मार्गदर्शक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खा. शरदपवार यांचे वर्ग मित्र होते.
त्यांनी कोल्हापूर येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा म्हणून त्यांनी काही काळ शिक्षकाचे काम केले. त्यांचे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व होते. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यामुळे ते सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात आले. त्यांनी सन 1980 मध्ये जनता पक्षाच्या वतीने वाळवा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी या काळात वाळवा तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. तत्पूर्वी ते सन 1967 ते 72 या कालावधीत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सदस्य होते. त्यांनी वाळवा तालुक्यातील शेकडो युवकांना वीज मंडळात नोकरी मिळवून देण्यात योगदान केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तून 40 हजार कामगार नेमून त्यांना रोजगार मिळवून दिला आहे.
सीआयडीचे निवृत्त अधिक्षक संजीवकुमार पाटील, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीपकुमार यांचे वडील तर वाळवा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शैलजा पाटील यांचे सासरे होत. त्यांच्या पश्‍चात विवाहित दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते शिव चरित्राचे अभ्यासक होते. त्यांनी राज्यातील बहुतांश गड-किल्ल्यांच्या पायी, सायकल व मोटारीतून मोहिमा केल्या आहेत. वीज मंडळाचे सदस्य असताना त्यांनी रायगड किल्ल्यावर वीज पोहचविली.

COMMENTS