पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

Homeताज्या बातम्यापुणे

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

भगवे वस्त्र परिधान करत तरूणाने केले कोयत्याने वार

पुणे ः शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. भगवे वस्त्र धारण केलेल्या तरूणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्वाने वार करत

पोलिसाला चावा घेणारा आरोपीला अखेर अटक
मान्सूनचे शुभवर्तमान
सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी


पुणे ः शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. भगवे वस्त्र धारण केलेल्या तरूणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्वाने वार करत पुतळ्याचे डोके उडवण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री ही घटना घडली. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करणार्‍याला पोलिसांनी अटक केली.

सुरज शुक्ला असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस अधिक चौकशी करत आहेत. सूरज शुक्ला असे त्याचे नाव आहे. पुतळ्याच्या चौथर्‍यावर तो हातात कोयता घेऊन चढला होता. काही लोकांनी त्याला धरून खाली खेचल्याने पुढील अनर्थ टळला. पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथर्‍यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला. पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार करण्यात आले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.

रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत सुरज शुक्लाला खाली उतरवून ताब्यात घेतले. काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात सोमवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. अरविंद शिंदे म्हणाले, मागील 12 वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.

या विटंबनेच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवत असून पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत.

COMMENTS