Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक येथे महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नाशिक : महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक परिमंडळ कार्यालय तसेच नाशिक मंडळातील कार्यरत सर्व अभियंते,अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी, दै

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
निलंगा येथे मिलींदनगरातील स्मशानभूमीची दूरवस्था
मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच
Displaying Photo 1.jpeg

नाशिक : महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक परिमंडळ कार्यालय तसेच नाशिक मंडळातील कार्यरत सर्व अभियंते,अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी, दैनंदिन कार्यातील ताणतणाव कमी होऊन, आपसांतील स्नेहभाव वृद्धिंगत होऊन ग्राहकसेवेसाठी नवऊर्जा मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ०६ जून रोजी शनिवारी गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात आले होते. मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर, मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि उपस्थित बहुसंख्य चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून  वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येवून  सर्वांनी विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचा संकल्प करून वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे  मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष  नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये  नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश थूल व मिलिंद ढोबळे उपस्थित होते.

महावितरण प्रगतीचे नवे टप्पे गठित असताना  भविष्यात येणाऱ्या आव्हानांवर चिंतन करून त्यांना सामोरे जाण्यासाठी  सज्ज राहावे.  इतिहास मार्गदर्शक असतो, त्या मार्गदर्शनातूनच नवीन शिकत राहून कंपनीच्या विकासासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.  त्यासाठी आपण सर्वांनी अद्ययावत असणे देखील गरजेचे आहे आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी यासाठी नक्कीच सक्षम आहेत. महावितरणचा केंद्रबिंदू हा ग्राहक असून त्यांना गतिमान  सेवा देणे गरजेचे आहे असे आवाहन  कार्यक्रमाचे उद्घाटक  मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांनी  केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी मनोगत व्यक्त करताना, या वर्षांपासून सुरू झालेल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुरक्षा सप्ताहात  परिमंडळातील कर्मचारी यांनी हिरारीने  सहभागी झाल्याचा उल्लेख केला. महावितरण कंपनीने सुद्धा  कर्मचाऱ्यांना भरभरून दिले असून आपण सर्वजण परिमंडळातील ग्राहकांना अधिक तत्पर व गतिमान सेवा देण्यासाठी सर्वांच्या  सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त केली.  यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी समयोचित आपले मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्युत सुरक्षा व गो-ग्रीन योजना या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढीत उपस्थित सर्व कर्मचारी व कुटुंबीयांनी भरघोस  प्रतिसाद दिला कार्यक्रमात आयोजित म्युझिकल ऑर्केस्ट्रा कार्यक्रमातून कलावंतांनी विविध नवीन – जुनी, मराठी हिंदी गीत गायनाने कार्यक्रमात रंगत भरली होती. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थित सर्वांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन व्यवस्थापक मंगेश गाडे यांनी केले.

याप्रसंगी नाशिक परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंते योगेश निकम, जगदीश जाधव, चेतन वाडे, नंदकिशोर काळे,  उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक हेमंत भामरे, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भडके यांचेसह नाशिक परिमंडळ व नाशिक मंडल कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS