Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरात २ लाख ४६ हजार वीज ग्राहकांकडे ४९ कोटी रुपये थकीत

अहिल्यानगर : अहिल्यानगर मंडळातील  घरगुती, औदयोगिक,  वाणिज्यिक व ईतर  वर्गवारीच्या २ लाख ४६ हजार ११७ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ४९ कोटी ०२ ला

कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी
लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर मंडळातील  घरगुती, औदयोगिक,  वाणिज्यिक व ईतर  वर्गवारीच्या २ लाख ४६ हजार ११७ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ४९ कोटी ०२ लाख रुपये थकबाकी असुन, थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे  अहिल्यानगर मंडळातील जानेवारी महिन्यात ३ हजार ८२७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. 
अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या २ लाख ४६ हजार ११७ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ४९ कोटी ०२ लाख रुपये थकबाकी असुन यामध्ये घरगुती २

 लाख २० हजार ५८० ग्राहकांकडे ३३ कोटी ३१ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ३४१ ग्राहकांकडे ६ कोटी १७ लाख रुपये, औद्योगिक २ हजार १०८ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख रुपये, सार्वजनिक सेवा ५ हजार ११३ ग्राहकांकडे ५ कोटी ६३ लाख रुपये व इतर ९७५ ग्राहकांकडे ३५ लाख रुपये थकबाकी आहे.  त्यामुळे अहिल्यानगर ,मंडळातील सर्वच विभागामध्ये वीज थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीज पुरवठा खंडीत  करण्याची मोहीम जोरात सुरु आहे या अंतर्गत जानेवारी महिन्यात ३ हजार ८२७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्याबरोबरच थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले त्यानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. 

दरमहा सातत्याने  पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीजबिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS