Homeताज्या बातम्यादेश

कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश ; 42 जणांचा मृत्यू

अस्थाना : कझाकिस्तानमध्ये बुधवारी अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले. बाकूहून रशियाला जाणार्‍या या विमानात 67 प्रवासी 5 क्रू मेंबर्स असे एकूण 72 जण

पुरवठा अधिकार्‍याच्या खुर्चीचा ताबा घेतला सेल्समनने
प्रदूषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच
व्याजापोटी सावकाराने नेल्या शेळ्या: आठवड्यात सावकारीचा तिसरा गुन्हा दाखल

अस्थाना : कझाकिस्तानमध्ये बुधवारी अझरबैजानचे प्रवासी विमान कोसळले. बाकूहून रशियाला जाणार्‍या या विमानात 67 प्रवासी 5 क्रू मेंबर्स असे एकूण 72 जण होते. यातील 42 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. वातावरणातील धुक्यामुळे अझरबैजान एअरलाइन्सच्या या विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनार्‍याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झाले हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, विमान क्रॅश झाल्याने मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ख्रिसमसच्या सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचे हे विमान आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालायने याबाबत माहिती देताना सांगितले की, विमान दुर्घटनेच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाची पोहोचली आहे. सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत.

COMMENTS