Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरखेडमध्ये चालत्या बसमधून ७३ प्रवाशांना उतरवून बसला लावली आग

उमरखेड प्रतिनिधी - नांदेडहून नागपूरसाठी रात्री नऊ वाजता निघालेल्या एसटी बसला दोन मोटरसायकल घेऊन आलेल्या चार अज्ञातांनी मोटारसायकल बससमोर आडवी

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांसह १४ पदाधिकऱ्यांनी शिवसेना पक्ष पदाचा दिला राजीनामा |
दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
नगर जिल्ह्यात देशाला हादरून टाकणारा भ्रष्टाचार

उमरखेड प्रतिनिधी – नांदेडहून नागपूरसाठी रात्री नऊ वाजता निघालेल्या एसटी बसला दोन मोटरसायकल घेऊन आलेल्या चार अज्ञातांनी मोटारसायकल बससमोर आडवी लावून बस अडविली. त्यांच्या पाठीमागून आलेल्या पाच-सहा लोकांनी काही कळायच्या आत बसची तोडफोड करून टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना शुक्रवारी (ता.२७) रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान उमरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदी पुलावर गोजेगावजवळ घडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.नांदेड आगाराची बस (क्र. एमएच२० जीसी३१८९) ही शुक्रवारी नांदेड-नागपूर मार्गावर धावत असताना रात्री ११ च्या सुमारास हदगाव-उमरखेडदरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा नदी पुलाजवळ आली असता त्या ठिकाणी दोन दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकी आडव्या लावून बस थांबविली.त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाचसहा अज्ञात व्यक्तींनी बसमध्ये असलेल्या ७३ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. पाठीमागून आलेल्या आणखी पाचसहा अज्ञात व्यक्तींनी काठीने बसच्या काचा फोडल्या व बसच्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत बस जळून खाक झाली. यामध्ये बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले. बस चालक बी. डी. नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस पथक, अग्निशामक दलासह घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. घटनास्थळी नांदेड व यवतमाळचे विभाग नियंत्रक, उमरखेड आगाराचे व्यवस्थापक प्रकाश भदाडे हे देखील पोहचले. त्यांनी पर्यायी बसची व्यवस्था करून प्रवाशांना सुखरूप नागपूरकडे रवाना केले. ह्या बसला कुणी व का आग लावली, याचा तपास पोलिस करीत आहेत

COMMENTS