Homeताज्या बातम्यादेश

गुंतवणुकीच्या नावाखाली 712 कोटींची फसवणूक

टेलिग्रामवर रिव्ह्यूच्या बहाण्याने फसवणूक, हिजबुलशी संबंधित 9 जणांना अटक

हैदराबाद/वृत्तसंस्था ः गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर गुन्हे करणार्‍या 9 जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरात 712 कोटी रुपयांच

पुण्यात व्यावसायिकाची 52 लाखांची फसवणूक
शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा
डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला

हैदराबाद/वृत्तसंस्था ः गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर गुन्हे करणार्‍या 9 जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरात 712 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सायबर गुन्हेगारांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सेलफोन, लॅपटॉप आणि डेबिट कार्ड जप्त केले. सायबर गुन्हेगार मुंबई, लखनौ, गुजरात, हैदराबाद येथील आहेत. त्यांचा दुबई आणि चीनमधील सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपींकडून रिव्ह्यूच्या बहाण्याने कमाईचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी देशभरातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे, जे चीनी ऑपरेटर्सच्या इशार्‍यावरून काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीशी संबंधित काही क्रिप्टो वॉलेट व्यवहारांची दहशतवादी संघटना हिजबुल्लाह वॉलेटशीही लिंक सापडली आहे. हे वॉलेट टेरर फायनान्स मॉड्यूलशी जोडलेले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 22 सिमकार्ड, 4 डेबिट कार्ड, 3 चेकबुक आणि 33 कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.  हैदराबाद येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या चौकशीतच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्या व्यक्तीला टेलिग्रामवर रिव्ह्यूसाठी अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली होती. त्याने विश्‍वास ठेवला आणि वेबसाइटवर नोंदणी केली. सुरुवातीला, त्याला हजार रुपये गुंतवायला लावले गेले आणि गोष्टींना रेटिंग देण्याचे सोपे काम देण्यात आले. या कामात त्याला 800 रुपयांचा नफा झाला. यानंतर त्या व्यक्तीने 25,000 रुपये गुंतवले आणि 20,000 रुपये नफा कमावला. मात्र, त्याला हे पैसे काढण्याची परवानगी मिळाली नाही. नंतर अधिक कमाईचे आमिष दाखवून त्याच्याकडून आणखी पैसे गुंतवून घेतले, मात्र हे पैसे परत आले नाहीत. अशा प्रकारे त्या व्यक्तीची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही टोळी अशा प्रकारे लोकांना फसवायची. तपासात पोलिसांना हे 28 लाख रुपये 6 बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचे समोर आले. येथून ही रक्कम वेगवेगळ्या भारतीय बँक खात्यांमध्ये वर्ग करून नंतर दुबईला पाठवण्यात आली. या रुपयाने तेथे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यात आल्या. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केली आहे, जो चिनी ऑपरेटर्सशी संबंधित होता. आरोपी भारतीय बँक खात्यांचे तपशील आणि ओटीपी चीनी ऑपरेटर्सना पाठवायचे. चीनी ऑपरेटर रिमोट ऍक्सेस अ‍ॅप्सद्वारे दुबई आणि चीनमध्ये बसून ही भारतीय खाती ऑपरेट करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 65 बँक खात्यांची माहिती चिनी ऑपरेटर्सना दिली होती. यामध्ये 128 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. त्याच वेळी, इतर अनेक बँक खात्यांद्वारे 584 कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले गेले. अशाप्रकारे देशातील जनतेची 712 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

COMMENTS