Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 59 हजार कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे

साडे पाच वर्षांतील गुन्हे, शिक्षेचे प्रमाण केवळ 4 टक्के

मुंबई ः पुण्यापाठोपाठ सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे राजधानी मुंबईत घडतांना दिसून येत आहे. मुंबईसारख्या शहरात गेल्या साडेपाच वर्षांत 59 हजार कोटी रुपय

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडे पाच लाखाचा गंडा
महिलेची सुमारे 1 कोटी 17 लाखांची फसवणूक
डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला

मुंबई ः पुण्यापाठोपाठ सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे राजधानी मुंबईत घडतांना दिसून येत आहे. मुंबईसारख्या शहरात गेल्या साडेपाच वर्षांत 59 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील केवळ चार टक्के प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले आहेत. जानेवारी 2018 ते जुलै 2023 या कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेत सुमारे 594 गुन्हे दाखल झाल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहितीतून स्पष्ट झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल 594 गुन्ह्यांपैकी 264 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून त्यात आरोपत्र अथवा गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. म्हणजेच निम्याहून अधिक प्रकरणे अद्यापही तपासाधीन असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होत आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या 594 प्रकरणांमध्ये 59 हजार 75 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या रकमेचा हा आकडा खूप मोठा आहे. तसेच 1 जानेवारी 2018 ते जुलै 2023 या कालावधीत तब्बल 319 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर केवळ 14 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. त्यामुळे दोष सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांतील 93 आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. व्हाइट कॉलर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत सुधारणा आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात आरोपी निर्दोष सुटत असल्यामुळे याबाबत चौकशी होण्याची गरज असल्याचे द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले. घाडगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहितीत हा सर्व प्रकार उघड झाला आहे. मुंबईत साडेपाच वर्षांत 59 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असताना केवळ 37 कोटी 24 लाख 81 हजार 214 एवढी रक्कमच तक्रारदारांना परत करण्यात आली. फसवणूक झालेल्या 59 हजार कोटी रुपयांच्या तुलनेत तक्रारदाराला परत मिळालेली रक्कम एक टक्काही नाही.

COMMENTS