Homeताज्या बातम्यादेश

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

अनेक कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

१७ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्

‘लॉली’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
‘अवतार २’ पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज

१७ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्टला करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला आहे. ‘पुष्पा’ चित्रपट १७ डिसेंबर २०२१ साली तेलुगू भाषेत रिलीज झाला. चित्रपटाची क्रेझ इतकी होती की निर्मात्यांनी हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित निर्णय घेतला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. अल्लू अर्जुनला याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अल्लू अर्जुनच्या “पुष्पा भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. अल्लू अर्जुन लूक अल्लू अर्जुनने या खास सोहळ्यासाठी त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. या सोहळ्यासाठी अल्लू अर्जुनने व्हाईट रंगाचा आऊटफिट निवडला होता. ब्लॅक पॉकेट असलेला व्हाईट सूट अल्लू अर्जुनने घातला होता. तसेच त्यावर त्याने एक भारी गॉगल देखील लावला होता. अल्लू अर्जुनसह कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. RRR चित्रपटाला ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रादेशिक चित्रपटांची यादी पुढीलप्रमाणे.

‘होम’ हा सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट ठरला आहे. काडैसी विवसयी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. ‘उपेना’ हा सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट तर ‘छेलो शो’ हा सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट म्हणून निवडण्यात आला आहे. ‘बूम्बा राइड’ सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट, अनुर’ सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट ठरले आहेत. ‘कालोखो’ बंगाली, 777 चार्ली’ कन्नड, ‘समांतर’ मैथिली या चित्रपटांना प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा देवी श्री प्रसाद सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आरआरआर

सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन पुरस्कार- RRR (स्टंट कोरिओग्राफर- किंग सॉलोमन) सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित) सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर व्ही श्रीनिवास मोहन) – सर्वोत्कृष्ट नॅरेशन व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट- कुलदा कुमार भट्टाचार्जी – सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- इशान दिवेचा – सर्वोत्कृष्ट संपादन- अभ्रो बॅनर्जी नॉन फीचर फिल्म

COMMENTS