ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक

Homeताज्या बातम्यादेश

ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक

टोक्यो : बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू

नीरज चोप्राचे निर्भेळ यश
मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई
ऑलिम्पिक प्रसारणात प्रसारभारतीची नेत्रदीपक कामगिरी

टोक्यो : बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. दरम्यान, बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी 26 वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती. मात्र चायनीज तैपईच्या 27 वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर 21-18, 21-12 असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. ही लढत तिने 40 मिनिटांत जिंकली.

COMMENTS