Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी व शेवगावांतील पिकांचे पंचनामे करावेत

आमदार मोनिका राजळे यांची धनजंय मुंडे यांच्याकडे मागणी

पाथर्डी/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात यावर्षीच्या हंगामातील पावसाच्य

ऊसतोड मजुरांच्या धान्य चोरी प्रकरणी पती-पत्नीसह तिघे ताब्यात
दैनिक लोकमंथन l बोठेनं मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला पाच लाखांचा लाभ
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पाथर्डी/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात यावर्षीच्या हंगामातील पावसाच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असुन पिके करपली आहेत त्यामुळे दोन्ही तालुक्यातील सर्वच महसुल मंडळातील पिकांचे पंचनामे करण्यात येवुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की माझ्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील 126285 शेतकर्‍यांनी 57395 हेक्टर व शेवगाव तालुक्यातील 92090 शेतकर्‍यांनी 53372 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा भरला आहे. शासननिर्णय पिक विमा मुद्दा क्र. 10/2 व 11/1 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थीती व पावसातील खंड याबाबी अंतर्गत दोनही तालुक्यातील सर्व महसूल मंडळाची पिक विमा पंचनाम्यासाठी निवड होणे गरजेचे आसतांनाही निवड झालेली नाही.सदर निवड ही महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या साहयाने घेतली आहे.परंतु मंडळ स्तरावर एकच पर्जन्य मापक बसविलेले असते त्यानुसार त्या मंडळातील 20 ते 25 गांवाचे पर्जन्यमान धरले जाते परंतु मंडळातील अनेक गांवामध्ये पाऊस पडलेला नसतांनाही केवळ मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या आधारे नोंदलेल्या पावसाचा निकष न लावता पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचे आहे. पाथर्डी तालुक्यातील सहा मंडळापैकी फक्त पाथर्डी या एकच मंडळाचा पिक विमा पंचनाम्यासाठी समावेश झाला आहे तर शेवगांव तालुक्यातील शेवगांव, बोधेगाव, एरडगांव या तीनच मंडळाचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदांडी, टाकळीमानूर, मिरी, करंजी, कोरडगांव तसेच शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव, चापडगांव व ढोरजळगांव ही महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत. वगळण्यात आलेल्या या सर्वच महसूल मंडळात यावर्षीच्या हंगामात अत्यंत कमी पावसाअभावी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले असून पिके करपली आहेत. त्यामुळे सर्वच महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. तरी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील वगळ्यात आलेल्या वरील सर्वच महसूल मंडळातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी व विनंती आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली.

COMMENTS