Homeताज्या बातम्याक्रीडा

ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर

आयपीएलनंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघही जाहीर करण्यात आला आहे. तर सप्टेंब

शंभर हुन अधिक महिलांच्या सहभागाने लोणंद येथे दुचाकी रॅली ; रॅलीतून दिला महिला सक्षमीकरणाचा संदेश
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर वाहतूक पोलिसांची कारवाई
पाऊस व पराभवाने केले टिम इंडियाचे द.आफ्रिकेत स्वागत

आयपीएलनंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघही जाहीर करण्यात आला आहे. तर सप्टेंबर महिन्यात आशिया कप आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.दरम्यान, या मोठ्या स्पर्धांआधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आलीय. अपघातामुळे दुखापत झालेला ऋषभ पंत या स्पर्धांमध्येही खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंत सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. पंतच्या पुनरागमनासाठी आणखी काही काळ लागू शकतो. तो जानेवारीपर्यंत मैदानावर परतल्यास लवकर बरा झाला असं मानलं जाईल. सध्या त्याची प्रकृती सुधारत असली तरी फिट होण्यासाठी सात ते आठ महिने लागतील. ऋषभ पंत नुकताच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या काही सामन्यावेळी उपस्थित होता. त्याला कोणाच्याही मदतीशिवाय चालण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील. अपघातात थोडक्यात बचावलेल्या पंतवर सर्जरी कऱण्यात आली होती. त्यानंतर तो आता बरा होत आहे. त्याला यष्टीरक्षण करण्यास अद्याप वेळ लागू शकतो. सुरुवातीला तो फक्त फलंदाज म्हणून मैदानावर उतरू शकतो. एकदिवसीय वर्ल्ड कप वर्षाच्या अखेरीस भारतात खेळण्यात येणार आहे.

COMMENTS