कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश

अहमदनगर : लोकशाही धोक्यात आहे, असे टाहो फोडणाऱ्या सर्व विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही आहे का ? घराणेशाही व परिवारवादीच सर्व पक्ष आहेत. मात्र भाजप

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
कोरोनाच्या संकट काळात ‘ संजीवनी’ ने उचलले मोलाचे पाऊल
फराह खान आणि साजिद खानने घेतले साईसमधीचे दर्शन 

अहमदनगर : लोकशाही धोक्यात आहे, असे टाहो फोडणाऱ्या सर्व विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही आहे का ? घराणेशाही व परिवारवादीच सर्व पक्ष आहेत. मात्र भाजप हा लोकशाही मूल्य जपत अंतर्गत लोकशाही पाळत सर्वांना समान संधी देणारा देशातील एकमेव पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे प्रधानसेवक म्हणून गेल्या ८ वर्षांपासून देशात म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य नागरिक व शेवटचा घटक केंद्रबिंदू ठेवून सुरु केलेल्या सर्व योजनांच्या प्रभावी अमलबजावणीमुळे पूर्वीची २२ टक्क्यांवर असलेलली दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आता केवळ १० टक्क्यांवर आली आहे. या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. नगरमध्ये आज भुजबळ भाजपात आल्याने पक्षाचे बळ नक्कीच वाढणार आहे, असे प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी केले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.आशिष शेलार हे बुधवारी नगरमध्ये आले होते. लेंडकर मळा येथे शहर भाजपच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात आ.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व बालिकाश्रम रोड परिसरात मोठा मित्रवर्ग असलेले ओंकार लेंडकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे होते. यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक प्रदीप परदेशी, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, बाबा सानप आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांच्या भाजपात प्रवेशासाठी किशोर डागवाले यांनी विशेष प्रयत्न केले. महेंद्र गंधे म्हणाले, बाळासाहेब भुजबळ हे पूर्वी भाजपाचे कार्यकर्ते होते. पुन्हा भाजपात प्रवेश करण्याचा योग्य निर्णय त्यांनी घेतला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपात न्याय मिळतोच. आ.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चीत आहे. या निवडणुकीत नगर शहर भाजप एका प्रभागामध्ये प्रचाराची जवाबदारी घेणार आहे. किशोर डागवाले म्हणाले, भाजपाची बुलंद तोफ असलेले आ.आशिष शेलार आज मुंबई मध्ये धडाडीने काम करत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रसला टक्कर देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबई नक्कीच काबीज करणार आहे. बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपाची ताकद निश्चित वाढणार आहे. ओंकार लेंडकर यांच्याबरोबर मोठ्याप्रमाणात युवा वर्ग असल्याने त्यांचा मुळे उपनगरात पक्षाचे काम वाढणार आहे.
प्रास्ताविक सुनील रामदासी यांनी केले. ज्ञानेश्वर काळे यांनी सूत्रसंचालन केले, नरेंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ज्योती दांडगे, सविता तागडे, सविता कोटा, सागर गोरे, अॅड. सुनील सूर्यवंशी, रोहन डागवाले, शशांक कुलकर्णी, सुहास पाथरकर, दत्ता गाडळकर, वैभव यादव, कृष्णा मुदीगोंडा, सिद्धार्थ बचारे, विकी गोंधळे, ओंकार नीरफरके, शुभम गुरुड, अभिजित बुरुडे, आकाश सोनावणे, संदेश कानडे, गौरव दळवी आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS