Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेट्रोच्या सल्लागारावर 368 कोटींची खैरात

‘कॅग’च्या अहवालात ओढले ताशेरे

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील मेट्रोचे काम पूर्णत्वास जातांना दिसून येत असले तरी, यातील त्रुटी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर समोर येतांना दिसून ये

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक
भाजपचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील मेट्रोचे काम पूर्णत्वास जातांना दिसून येत असले तरी, यातील त्रुटी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर समोर येतांना दिसून येत आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी नेमलेल्या मुख्य सल्लागारांना विनानिविदा काम देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुख्य सल्लागारांवर तब्बल 368 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महालेखापालांच्या (कॅग) अहवालात यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्प राबवला. या प्रकल्पाबाबत कॅगने 12 डिसेंबर 2022 रोजी अहवाल दिला. या अहवालात पुणे मेट्रोचाही उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार, नागपूर मेट्रोसाठी मुख्य सल्लागार म्हणून सिस्ट्रा, एकॉम, एजिस आणि राईट्स या कंपन्यांचा गट काम पाहत होता. त्यांना नागपूर मेट्रोचे 221 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. नंतर या कंपन्यांना पुणे मेट्रोच्या मुख्य सल्लागारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी मे 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीसाठी हंगामी म्हणून सोपवण्यात आली. महामेट्रोने या कंपन्यांना पुणे मेट्रोसाठी 183 कोटी रुपयांचे काम विनानिविदा हंगामी स्वरूपाने दिले. पुणे मेट्रोच्या मुख्य सल्लागारांसाठी निविदा मागवण्यात आल्या नव्हत्या. नव्याने निविदा प्रक्रिया राबवल्यास विलंब होईल आणि सध्याच्या कामाच्या दरापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील, असा युक्तिवाद महामेट्रोने यासाठी केला होता. नंतर मात्र, पुणे मेट्रोच्या मुख्य सल्लागारांसाठी महामेट्रोने निविदा प्रक्रिया राबवली. हे काम नोव्हेंबर 2020 मध्ये निविदा प्रक्रिया राबवून दिले. या कामाचे मूल्य 185 कोटी रुपये होते. म्हणजेच पुणे मेट्रोच्या सल्लागार कंपन्यांवर एकूण 368 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.

COMMENTS