Homeताज्या बातम्या

पुणेकरांनी भरला 1520 कोटींचा मिळकतकर

पुणे : मिळकतकरातून चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 520 कोटी रुपयांचे उत्पन्न डिसेंबर अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आह

स्वप्नात झाला स्वामींचा साक्षात्कार… दुसऱ्यादिवशी घडला चमत्कार… श्री स्वामी समर्थ | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav | LokNews24
गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हितासाठी काम केलं तर ग्राहक देखील सहकार्य करेल – प्रताप हेगाडे

पुणे : मिळकतकरातून चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 520 कोटी रुपयांचे उत्पन्न डिसेंबर अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्न 225 कोटींनी जास्त आहे. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 2022-23 मिळकतकर विभागातून 2 हजार 400 कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मिळकतकरातून 1 हजार 520 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले असून उर्वरित तीन महिन्यांत नऊशे कोटी रुपये जमा होतील, असा विश्‍वास महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत 1 हजार 295 कोटींचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते. महापालिकेकडून मिळकतकराची देयके आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात (एप्रिल) पाठविली जातात. तर देयकांची दोन सहामाहीत विभागणी केली जाते. त्यात पहिली सहामाहीचा कालावधी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत तर दुसर्‍या सहामाहीचा कालावधीत 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर असा असतो. मिळकतकरधारकांनी 31 मे पर्यंत कर भरल्यास त्यांना सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्क्यांची सवलत दिली जाते. दुसर्‍या सहामाहीत मिळकतकर न भरल्यास मिळकतधारकांना थकबाकीच्या रकमेवर प्रति महिना दोन टक्के कर आकारला जातो. दंड आकारण्याची ही प्रक्रिया महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेला प्राप्त झालेल्या 1 हजार 520 कोटी रुपयांमध्ये 15 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधून प्राप्त झाले आहे. तर 1 हजार 505 कोटी रुपये हे शहराच्या जुन्या हद्दीतून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली.

COMMENTS