पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद

पाथर्डी/प्रतिनिधी : पाथर्डी येथील सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासाच्या आत अटक करण्यात पाथर्डी पोलि

Sangamner : कोविडचे नियमच तहसीलदार अमोल निकम यांनी बसवले धाब्यावर (Video)
कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार
मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? l LokNews24

पाथर्डी/प्रतिनिधी : पाथर्डी येथील सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासाच्या आत अटक करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सोसायटी निवडणुकीनंतर झालेल्या खून प्रकरणातील दहा आरोपींना अहमदनगर पोलिसांनी तांत्रिक तपास करून व सापळा रचून पाठलाग करुन बारा तासाच्या आत अटक केली.
याबाबतची ती अशी की दि. 18 रोजी सायंकाळी साडे वाजता विजयी पॅनेल श्रीबालाजी शेतकरी विकास मंडळ पॅनेलतर्फे साउंड सिस्टीम लावून मिरवणूक चालू असताना 15 ते 20 लोकांनी देवराई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याच्या कारणावरुन मिरवणुकीवर तलवार, सुरा, लोखंडी कुर्‍हाड, लाकडी दांडके, काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अजय गोरक्ष पालवे याचा खून झाला व इतर लोक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बाळासाहेब नवनाथ पालवे (वय 40 वर्षे, रा.देवराई ता.पाथर्डी, जिल्हा अ.नगर. सध्या रा. एक्सप्रेशिन जवळ, पाथर्डी फाटा, नाशिक ता. जिल्हा नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाकाबंदी करून आरोपी पकडले
खुनाच्या घटनेनंतर देवराईच्या ग्रामस्थांनी अहमदनगर ते तिसगाव जाणार्‍या महामार्गावर येवून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करीत दोन ते तीन तास रस्ता रोको केला होता. दुसरीकडे खुनाच्या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा सतर्क केली. अतिशय कमी कालावधीत सांघिक तपास करताना आरोपींची माहिती काढून त्यांचा पाठलाग केला तसेच सोनई पोलिस ठाणे, शनीशिंगणापूर पोलिस ठाणे, शेवगाव पोलिस ठाणे आणि नेवासा पोलिस ठाणे यांच्या मदतीने विविध ठिकाणी नाकाबंदी केली. दरम्यानच्या कालावधीत पाथर्डी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील सुनील एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे व अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी हे त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडी (क्रमांक एम.एच.16 बी.झेड.3131) याने भरधाव वेगाने तिसगाव येथून मिरी माका, देडगाव, कुकाणा, नेवासा या मार्गाने पळून जात असताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी त्यांच्या पथकाने आणि पाथर्डी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने तसेच गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप यांनी खासगी वाहनाने पाठलाग करीत असताना नेवासा पोलिस पथकाने नेवासा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान या गाडीला पकडले. या फॉर्च्युनर गाडीमधून पोलिसांनी संजय विष्णू कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या पथकाने अक्षय संभाजी पालवे यास ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिसांनी यशस्वी करुन बारा तासाचे आत खुनातील आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केला थरारक पाठलाग
पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात राडा होवून झालेल्या मारहाणीत एकीचा खून झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रस्ता रोको सुरू झाल्याने देवराई परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत केला होता व दुसरीकडे आरोपींचा दीड ते दोन तास थरारक पाठलाग करीत 10जणांना ताब्यात घेतले. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक कायंदे व वाघ, पोलिस उपनिरीक्षक डांगे, गोपनियतेचे भगवान सानप, पोलिस नाईक अनिल बडे व नवगीरे, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलिस नाईक ईश्‍वर गर्जे, सहायक फौजदार कराड, चालक किशोर पालवे तसेच नेवासाचे पोलिस निरीक्षक करे, पोलिस नाईक राहुल यादव, हेड कॉन्स्टेबल तोडमल, कॉन्स्टेबल गुंजाळ, गलधर, म्हस्के यांच्यासह शेवगावचे पोलिस निरीक्षक निलास पुजारी व त्यांचे पथक, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी व त्यांचे पथक, शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक कर्पे व त्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडण्याची कारवाई केली.

COMMENTS