Homeताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून बाप लेकाचा मृत्यू

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातील खडकी येथे विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे कळमकर कुटु

‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
सर्वसामान्यांनाही उपलब्ध होणार वेंटिलेटर मशीन; हेळगाव येथील युवकाच्या प्रयत्नाला यश
आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातील खडकी येथे विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे कळमकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शेतातील कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना समाधान कळमकर यांना शेतातील सर्व्हिस वायर पडलेली दिसली. ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का लागल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडिल पंढरीनाथ कळमकर हे गेले असता त्यांना ही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचा मृत्यू झाला.

COMMENTS