कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तवली गेली असल्याने ती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना पहिले प्राधान्य राहणार अस

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
पारनेर साखर कारखान विक्रीची ईडीकडून चौकशी व्हावी

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तवली गेली असल्याने ती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना पहिले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन नगरच्या नव्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी शुक्रवारी केले. नगर शहराच्या विकास कामांबाबत तसेच प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याबाबतही निश्‍चितपणे प्रयत्न केले जाणार आहेत, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
नगरच्या महापौरपदाचा पदभार शेडगे यांनी स्वीकारला. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेविका सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, दत्ता कावरे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, विजय पठारे, तसेच संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माणिक विधाते, अभिजित खोसे, सचिन जाधव, संजय शेंडगे, दत्ता खैरे, प्रकाश भागानगरे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, संतोष गेनप्पा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.
नगर शहरामध्ये पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना व अन्य अनेक प्रलंबित प्रश्‍न आहे, नगर शहराचा विकास करताना मागील प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यावर आधी भर दिला जाणार आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, सध्या कोरोनाचे संकट सर्वत्रच आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला आगामी काळामध्ये काय उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन केले जाणार असून लवकरच यासंदर्भात बैठक आयोजित करणार असल्याचे महापौर शेंडगे यांनी यावेळी सांगितले.

विशाल गणेशाचे दर्शन
महापौरपदाचा पदभार घेण्याआधी रोहिणी शेंडगे यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले. विशाल गणेशाने सर्वांच्याच मनोकामना पूर्ण केल्या आहेत. श्रीगणेशाच्या आशीर्वाद रुपाने महापौरपदाची संधी आपणास मिळाली आहे. तेव्हा या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न करु. सर्वांच्या सहकार्याने नगर शहराचा परिपूर्ण व नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पुजारी संगमनाथ महाराज व देवस्थानचे सचिव अशोक कानडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका पुष्पा बोरुडे उपस्थित होत्या.

नगर मनपाचे प्रश्‍न सोडवू : गडाख
शिवसेना नगरसेवकांकडून मंत्री गडाख यांनी महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संभाजी कदम यांनी महापालिकेमध्ये नव्याने पदे भरतीबाबत तसेच वेगवेगळ्या योजना राबविण्याबाबत सरकारच्या माध्यमातून मदत करावी, अशी मागणी केली तर संजय शेंडगे यांनी, जी कामे प्रलंबित आहेत, ती कामे मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी केली. यावेळी मंत्री गडाख यांनी, अगोदर आपण एकत्रित बैठक घेऊ. त्यात जे काही प्रश्‍न आहेत, त्याची एकत्रित माहिती व अहवाल सादर करा. त्यातील जे स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न असतील, ते येथेच सोडवले जातील व जे राज्य सरकारच्या अखत्यारीत असतील, त्या संदर्भामध्ये संबंधित विभागाकडे आपण निश्‍चितपणे पाठपुरावा करून विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

COMMENTS