सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 196 रुग्ण; 23 जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 196 रुग्ण; 23 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 193 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 23 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल
चंद्रपुरात सिलिंडरचे भीषण स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही (Video)
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश


सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 193 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 23 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 31 (7906), कराड 133 (23627), खंडाळा 73 (10997), खटाव 398 (17284), कोरेगांव 163 (15271), माण 54 (11988), महाबळेश्‍वर 11 (4133), पाटण 51 (7400), फलटण 66 (27173), सातारा 185 (36943), वाई 25 (11947) व इतर 6 (1119) असे आज अखेर एकूण 1 लाख 75 हजार 788 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2 (179), कराड 3 (681), खंडाळा 1 (140), खटाव 0 (430), कोरेगांव 2 (335), माण 2 (232), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 1 (264), सातारा 12 (1108), वाई 0 (313) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 887 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

COMMENTS