शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडलेल्या सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्यातील 160जणांविरुद्ध शेवगाव प

नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल
नगर अर्बन बँकेची ठप्प वसुली खंडपीठात ;सहकार आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांना नोटीस
माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडलेल्या सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्यातील 160जणांविरुद्ध शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला आहे. या सर्व 160जणांना नोटिसा पाठवून त्यांना म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले आहे.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये घडलेल्या बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केल्यानंतर तपासाला आता वेग आला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोल्ड व्हॅल्युअरसह 159 जणांना नोटीस बजावून त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तसेच या 160जणांकडून वेळेत म्हणणे सादर झाले नाही तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुढील कारवाई करेल, असे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेमध्ये अनेक घोटाळे उघडकीला आलेले आहेत. पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटीचा कर्ज घोटाळा तसेच नगरच्या मुख्य शाखेतील सुमारे तीन कोटीचा चिल्लर घोटाळ्याबाबत पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. यात काही माजी संचालक, कर्जदार व बँकेच्या कर्मचार्‍यांना अटकही झाली आहे. त्यानंतर शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. बँकेबाबत दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. शेवगाव शाखेमध्ये 2018 साली बनावट सोनेतारण कर्जाचा विषय पुढे आलेला होता. तेथील व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी बँकेला त्याबाबतची पूर्वकल्पना दिलेली होती. मात्र बँकेचे तत्कालीन सत्ताधारी व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. तीन वर्ष याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्ती केली व संचालक मंडळ बरखास्त केल्यावर प्रशासकांनी या पिशव्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेला लिलाव करण्यासाठी या पिशव्या उघडल्यावर नगरच्या मुख्य शाखेमध्ये या पिशव्यांमध्ये बनावट सोने असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांचे बनावट सोने असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणासंदर्भामध्ये बँकेने एक महिन्यानंतर फिर्याद दिल्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्यांमध्ये बनावट सोन्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणामध्ये गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार असलेल्या 159 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधितांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नोटिशीला उत्तर देण्यासाठी ठराविक कालावधी सुद्धा करून देण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी आम्ही नोटीस बजावण्याचे काम पूर्ण केले असून, वेळेमध्ये आम्हाला उत्तरे आले नाहीत, तर आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.

ईींंरलहाशपीीं रीशर

COMMENTS