नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी - तब्बल सात वर्षांनी होत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचे रिंगण फुलू लागले आहे. गुरुवारी गुरुपुष्यांमृत

नगर अर्बन बँकेची ठप्प वसुली खंडपीठात ;सहकार आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांना नोटीस
नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या
नगर अर्बन बँक निवडणुकीत राजकीय एन्ट्रीला सुरुवात

अहमदनगर/प्रतिनिधी – तब्बल सात वर्षांनी होत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचे रिंगण फुलू लागले आहे. गुरुवारी गुरुपुष्यांमृत मुहूर्त साधून तब्बल 36जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे आता 18 जागांसाठी आतापर्यंत 48जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, बँकेच्या मागील सत्ताधार्‍यांपैकी बहुतेकांनी स्वतःसह आपली पत्नी, मुले वा अन्य नातेवाईकांचेही अर्ज भरल्याने तोही एक चर्चेचा विषय झाला आहे. मागील सत्ताकाळातील गैरकारभारामुळे भविष्यात आपल्यावर काही कारवाई होण्याची भीती असल्याने या मंडळींनी आपल्या मुलाबाळांना व नातेवाईकांना बँकेच्या सत्तेत बसवून सूत्रे आपल्या ताब्यात ठेवण्याचे मनसुबे असल्याचीही चर्चा रंगली आहे.

नगर शहर मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट हद्द मतदार संघातून 12, उर्वरित महाराष्ट्र राज्य मतदारसंघातून 5 व राज्य कार्यक्षेत्राबाहेरील मतदारसंघातून 1 अशा 18 जागांसाठी 28 नोव्हेंंबरला निवडणूक होत आहे. या 18 जागांमध्ये एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी व दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. मागील 26 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सहकार उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी 11 व दुसर्‍या दिवशी 1 अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी (28 ऑक्टोबर) तिसर्‍या दिवशी तब्बल 36 अर्ज दाखल झाले. गुरुवारी गुरुपुष्यांमृत योग असल्याने हा मुहूर्त साधून बँकेतील मागील सत्ताधारी सहकार पॅनेलचे इच्छुक तसेच बँक बचाव कृती समितीच्या इच्छुकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता रिंगणातील उमेदवारांची संख्या 48 झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यास आज शुक्रवारी (29 ऑक्टोबर) व सोमवारी (1 नोव्हेंबर) असे दोनच दिवस आता शिल्लक आहेत. 30 व 31 ऑक्टोबरला शनिवार-रविवार सुट्टी असल्याने या दिवशी निवडणूक कामकाज होणार नाही. त्यामुळे आता शुक्रवारी व सोमवारी आणखी किती अर्ज दाखल होतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

मुहूर्तावर केले अर्ज दाखल
बँकेचे मागील सत्ताधारी व बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांनी गुरुवारी मुहूर्तावर अर्ज दाखल केले. ते अर्ज असे- अनिल गट्टाणी, शैलेश मुनोत, रौनक शैलेश मुनोत, ईश्‍वर अशोक बोरा, संपतलाल बोरा, गिरीश केदारनाथ लाहोटी, राजेंद्र ताराचंद गांधी,साईदीप राजेंद्रकुमार अग्रवाल, राजेंद्रकुमार अग्रवाल, मनोज सुवालाल गुंदेचा, अच्युत पिंगळे, ज्ञानेश्‍वर काळे, सुरेश तिवारी, मेहुलकुमार भंडारी, दीपककुमार गांधी, संगीता दीपक गांधी, गीता उमेश गिल्डा, मनेष साठे, नंदा मनेष साठे, बाळू नारायण कटके, दीप चव्हाण, अजित अशोकलाल कटारिया, कमलेश हस्तीमल गांधी, संजय छल्लारे, अशोक कटारिया, रमणलाल भंडारी (जैन), रुपाली अभिजीत लुणिया, अतुल राधावल्लभ कासट, अमित राधावल्लभ कासट, ईश्‍वरलाल मूलचंद भंडारी, सोमनाथ सदाशिव लोखंडे, मनीषा रवींद्र कोठारी, दिनेश पोपटलाल कटारिया व नरेंद्र गर्ग आदींनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांपैकी काहींनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत तर काहींनी खुल्या व राखीव अशा दोन्ही गटांतून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दाखल एकूण अर्जांची संख्या 48 असली तरी प्रत्यक्षातील उमेदवार सुमारे 35 ते 40च्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. दाखल झालेल्या अर्जांची 3 नोव्हेंबरला छाननी होणार असून, त्यादिवशी नेमक्या किती उमेदवारांचे अर्ज दाखल झाले, हे स्पष्ट होणार आहे.

माजी संचालकांचे सहकार पॅनेल
अर्बन बँकेच्या माजी संचालकांनी सहकार पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरले. या माजी संचालकांनी गुरुवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शहर मतदार संघातून माजी व्हाईस चेअरमन अशोक कटारिया, शैलेश मुनोत यांनी तर सुरत येथील दिनेश कटारिया यांच्यासह संगमनेर शाखा मतदार संघातून अतुल राधावल्लभ कासट, शेवगाव शाखेतून नगरसेवक कमलेश गांधी, कर्जत शाखेतून रासपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र कोठारी यांच्या पत्नी मनीषा कोठारी व मागासवर्गीय संघातून नंदा साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी, शहर बँकेचे माजी चेअरमन डॉ.विजय भंडारी उपस्थित होते.

विशाल गणेशाचे दर्शन
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमु़ख़ व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह त्यांच्या काही सहकार्‍यांनी गुरुवारी सकाळी ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणेश मंदिरात दर्शन घेऊन मग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडे प्रयाण केले. बँक बचाव कृती समितीच्यावतीने स्वतः राजेंद्र गांधी यांच्यासह अनिल गट्टाणी, मनोज गुंदेचा, अच्युतराव पिंगळे, मेहुल भंडारी आदींसह अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या पॅनेलचे आणखी काही उमेदवार शुक्रवारी व सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.

COMMENTS