विविध मागण्यांसाठी हिवताप कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी हिवताप कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

नगर -  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात येऊन सेवेत असणारे पदोन्नती साखळीतील कर्मचारी पदोन्नती प

महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन
नगरपालिकेत सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन
तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत

नगर – 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात येऊन सेवेत असणारे पदोन्नती साखळीतील कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहत असल्याने त्यांचेवर होणारा अन्याय दुर करावा व जुन्या प्रवेश सेवा नियमानुसारच पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच नवीन पेन्शन योजना  रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

     या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात हिवताप संघटनेचे पुरुषोत्तम आडेप, प्रसाद टकले, नितीन नेवासकर, श्री.दाधवड,  प्रशांत सहस्रबुद्धे, संजय सावंत, भागवत गर्जे, श्री.मोटकर आदिंसह जिल्ह्यातील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

     याप्रसंगी पुरुषोत्तम आडेप म्हणाले, हिवताप निर्मुलन कर्मचार्‍यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी संघटनेच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी विविध आंदोलने, उपोषणे, निवेदने देण्यात आली परंतु तरीही या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तसेच शासनाने 2005 पासून शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करुन नवीन पेन्शन योजना सुरु  करुन कर्मचार्‍यांवर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे आज राज्यभर संघटनेच्यावतीने ‘ठिय्या आंदोलन’ करुन शासनाचे लक्ष वेधले आहे. आतातरी शासन कर्मचार्‍यांच्या मागण्यापूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS