Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरताच

आठ मतदारसंघात सरासरी 54 टक्के मतदान

मुंबई ः देशातील 13 राज्यात आणि 88 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत 60 टक्क्यांच्यावर मतदान नोंदवण्यात

मनपा अधिकाऱ्यांना शहरांमधील खड्ड्यात झोपविनार: शिवसेनेचा इशारा
राहुल गांधींवर पाकिस्तान कनेक्शनचा आरोप
अखेर कुस्ती महासंघाचे निलंबन  

मुंबई ः देशातील 13 राज्यात आणि 88 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत 60 टक्क्यांच्यावर मतदान नोंदवण्यात आले. मात्र महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत सरासरी केवळ 53.71 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये सर्वाधिक 77.93 टक्के मतदान झाले. महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53 टक्के मतदान झाले.

या दुसर्‍या टप्प्यासाठी 16 कोटी मतदार पात्र होते, पण त्यांपैकी सुमारे 9 कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 9 मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर 7 मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते. यामध्ये केरळमधील सर्व 20 मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील 13 मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसर्‍या टप्प्यात आसाममधील 5, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 3, कर्नाटकातील 14, मध्यप्रदेशातील 7, महाराष्ट्रात 8, मणिपूरमध्ये 1, राजस्थानात 13, त्रिपुरात 1, उत्तर प्रदेशात 8, पश्‍चिम बंगालमध्ये 3 आणि जम्मू व काश्मीर या राज्यात 1 मतदारसंघात आज मतदान पार पडलं. दुसर्‍या टप्प्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि 3 चित्रपट तारे रिंगणात आहेत. याशिवाय राहुल गांधी, शशी थरूर आणि हेमा मालिनी यांच्या जागांवरही मतदान होत झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी या 8 जागांचा समावेश आहे. या ठिकाणी केवळ 55 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यात वर्धा लोकसभा मतदार संघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर हिंगोलीत सर्वात कमी 52.03 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात मतदानाच्या वेळी अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. नांदेडमध्ये एका तरूणाने ईव्हीएम मशीन कुर्‍हाडीने फोडले. तर दुसरीकडे अनेक मतदान केद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तसेच परभणीतील बलसा खुर्द गावातील नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावकर्‍यांची मनधरणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः त्याठिकाणी पोहोचले होते. यानंतर बराच काळ चर्चा झाली. यानंतर गावकर्‍यांनी बहिष्कार मागे घेतला असून, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली होती.

COMMENTS