Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत

जामखेडला जक्का जाम आंदोलन ः संभाजी ब्रिगेडने दिला इशारा

जामखेड/प्रतिनिधी ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे जर काही बर वाईट झालं. तर राज्यभरातील आमदार,खा

काळानुरूप टपाल सेवेतही बदल ः अर्णव कंक्राळे
कोपरगाव तालुक्यातील सावकारी रॅकेट उघड
‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानात अकोलेकरांनी सामील व्हावे ः पिचड

जामखेड/प्रतिनिधी ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे जर काही बर वाईट झालं. तर राज्यभरातील आमदार,खासदार, मंत्री यांचे हातपाय शाबुत राहणार नाहीत. त्यांची खैर नाही तेव्हा लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा. असा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी जामखेड येथील चक्का जाम आंदोलनात दिला.
अंतरवली सराटी (अंबड,जालना) येथे मराठा आरक्षण प्रश्‍नासंदर्भात अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि. 10 सप्टेंबर रोजी जामखेड येथील खर्डा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सविस्तर भूमिका मांडतांना सांगितले की, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द करणारे खंडपीठ हे पाच न्यायमूर्तीचे असल्याने तो निर्णय हा एक नियम अथवा कायदा म्हणून स्वीकारला जातो. भविष्यात जर ओबीसी आरक्षणा संदर्भात कोणी हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. तर मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी लावलेले नियम ग्राह्य धरले. तर ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हे आरक्षण क्षमतेपेक्षा जास्त सिद्ध होईल. ओबीसी आरक्षण धोक्यात येईल म्हणून ओबीसी नेत्यांनी पुढचा विचार व अभ्यास करून भूमिका घ्यावी. सारथी या सरकारी संस्थेची निर्मिती 52 मराठयांच्या बलिदानातून झाली आहे. त्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. असेही त्यांनी मत मांडले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे, प्रहारचे जयसिंग उगले, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, डॉ. कैलास हजारे, भोसले आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या.  जालना येथील आंदोलक मराठा साजातील महिला,पुरुषांवर, व अबालवृद्धांवर जो लाठचार्ज करण्याचे आदेश खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते. म्हणून त्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा. मराठा समाजातील महिला पुरुषांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-चौकटः आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा  
आंदोलना दरम्यान ज्ञानेश्‍वरी भोगील यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे. म्हणून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जाकीर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने, तर नय्युम शेख प्रहार संघटनेच्या वतीने, तर पत्रकार यासीन शेख यांनी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. जामखेड तालुका वकील संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा दिला.
       -प्रतिक्रिया ः जर मराठा ओबीसीमध्ये असेल तर आणि तरच ओबीसी आणि मराठा समाजाची एकूण संख्या लक्षात घेऊन ओबीसी  आरक्षण अबाधित राहिलं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा मराठा समाजाला आरक्षण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आहे.- -आण्णासाहेब सावंत. प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

COMMENTS