Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी गावात 23 बिअर शॉपींना ना हरकत

पंढरपूर / प्रतिनिधी : आषाढीच्या वेळी पालखी मार्गावर विविध संतांच्या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. तिथे लाखो वारकर्‍यांचा पालख्यांसह मुक्काम हो

गांजाच्या शेती वर पोलिसांची धाड दोन आरोपी अटकेत
वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक: डॉ. भोसले
पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात

पंढरपूर / प्रतिनिधी : आषाढीच्या वेळी पालखी मार्गावर विविध संतांच्या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. तिथे लाखो वारकर्‍यांचा पालख्यांसह मुक्काम होतो. अशा गावातील बिअर शॉपींना विरोध होण्याऐवजी ग्रामसभेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 नवीन बिअर शॉपी सुरु करण्यास ना हरकत देण्याचा ठराव मंजूर झाला. गुरुवार, दि. 28 रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयाला विरोध कमी आणि पाठींबा जास्त अशी स्थिती पहावयास मिळाली. मग प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन तब्बल 23 बिअर शॉपींना ना हरकत देण्याच्या ठरावास मंजूरी देण्यात आली.
दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. यांनी पंढरपूर शहर आणि लगतच्या गावात परमीट रुम, बिअर शॉपीचे नवीने परवाने दिले जाणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक वर्षे नवीन परवाने दिले गेले नाहीत. परंतू त्यानंतरच्या काळात नवीन परमीट रुम व बिअर शॉपींच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली.
आषाढी यात्रेच्या वेळी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम वाखरी गावात असतो. त्यामुळे वाखरीत लाखो भाविकांची गर्दी होते. पंढरपूर-पुणे आणि पंढरपूर-सातारा रस्त्यावरील वाखरी हे प्रमुख गाव आहे. पंढरपूरपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या या गावात संत लक्ष्मणदास महाराजांची समाधी आहे. त्यामुळे तिथे विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने सुरु असतात. पालखी मार्गावरील या गावात सध्या तीन बिअर शॉपी सुरु आहेत. गुरुवारच्या ग्रामसभेमध्ये त्याचा कहरच पहायला मिळाला एक नव्हे दोन नव्हे तब्बल 23 नवीन बिअर शॉपी सुरु करण्यास ना-हरकत देण्यात आली. प्रत्येकी 1 लाख असे 23 लाख रुपये घेऊन वाखरी ग्रामपंचायतीने पंढरपूरच्या शिवेवरच दारुड्यांची गल्ली वसवली असल्याचे चित्र यामधून स्पष्ट होवू लागले आहे.

COMMENTS