वारणा नदीत कोडोलीतील माय-लेकीची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारणा नदीत कोडोलीतील माय-लेकीची आत्महत्या

कुरळप/वार्ताहर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील माय-लेकींनी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

केजरीवालांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी
पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री फौजा सिंग यांचा राजीनामा
दारूविक्रीचा वाद जीवावर बेतला, तरुणावर सपासप वार | LOK News 24

कुरळप/वार्ताहर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील माय-लेकींनी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. रेश्मा अमोल पारगावकर (वय 36), ऋदा अमोल पारगावकर (वय 13, दोघी रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलीस पाटील मोहन चांदणे यांनी याबाबत कुरळप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेश्मा पारगावकर एका दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते. आई व पती यांचा मृत्यू झाल्याने रेश्मा यांनी चार दिवसांची मुलगी दत्तक घेतली होती. ती मुलगी चार महिन्यांची झाल्यानंतर मतिमंद असल्याचे लक्षात आले. तरी देखील त्यांनी तिचा संभाळ केला. परंतू सध्या या मुलीचा सांभाळ करणे रेश्मा हिला अवघड झाले होते. त्या दोघी कोडोली येथे भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. रेश्मा कामावर गेल्यास मुलीचा सांभाळ करण्यासाठी घरी कुणीच नव्हते. कुणाचा आधार नसल्याने रेश्मा निराश होत्या. या निराशेतून रेश्मा यांनी या तेरा वर्षाच्या मुलीसह बुधवारी चिकुर्डे पुलावरून वारणा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह ऐतवडे खुर्दच्या माळी मळ्यातील नदीपात्रात ग्रामस्थांना दिसला. पोलिसांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रेस्क्यू पथकाला पाचारण केले. या पथकाच्या मदतीने दुपारी 4 वाजता मुलीचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. होडी नादुरुस्त झाल्याने काही वेळ शोधकार्यास अडथळा आला. पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, सपोनि दीपक जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. कुरळप पोलीस ठाण्याचे गजानन पोतदार यांनी पंचनामा केला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले. कोडोली पोलिसांचीही शोधकार्यासाठी मदत झाली.

COMMENTS